मुंबई

आझाद मैदानात ख्रिसमसचे आयोजन; नोवेल साळवे यांच्याकडून देशवासियांना शुभेच्छा

CD

आझाद मैदानात ख्रिसमसचे आयोजन; नोवेल साळवे यांच्याकडून देशवासीयांना शुभेच्छा
मुंबई, ता. २८ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी प्रदेश सचिव तसेच दि इंडियन ख्रिश्चन असोसिएशनचे संस्थापक नोवेल साळवे यांनी नाताळ (ख्रिसमस)च्या पूर्वसंध्येला देशवासीयांना तसेच सर्व ख्रिस्तीबांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.
मुंबईतील आझाद मैदानात गेल्या १३ दिवसांपासून न्यायाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आंदोलन सुरू असतानाच साळवे यांनी नाताळच्या पूर्वसंध्येला हा संदेश दिला. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा करताना त्यांच्या शिकवणीचे स्मरण ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ख्रिश्चन धर्म आणि पवित्र बायबलचा मूलमंत्र प्रेम, आपुलकी आणि शांती यांवर आधारित असल्याचे नमूद करत, या मूल्यांपासून दूर गेल्यास स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणे योग्य ठरणार नाही, असा संदेश साळवे यांनी समाजबांधवांना दिला. ख्रिस्ती समाजातील पूर्वजांनी केलेल्या त्यागामुळे आणि समाजोपयोगी कार्यामुळे आज समाजाचे अस्तित्व टिकून आहे, असे सांगत सध्याच्या पिढीनेही अशाच प्रकारचे चांगले कार्य करणे गरजेचे आहे. तरच भविष्यात ख्रिस्ती समाजाचे अस्तित्व भक्कम राहील, अशी अपेक्षा नोवेल साळवे यांनी या वेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

SCROLL FOR NEXT