मुंबई

नेरुळ पूर्व परिसरात उलवे शेअर रिक्षांचा सुळसुळाट

CD

नेरूळ पूर्व परिसरात उलवे शेअर रिक्षांचा सुळसुळाट
प्रवासी त्रस्त
उलवे, ता. २४ (बातमीदार) : नेरूळ रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरात उलवे दिशेने जाणाऱ्या शेअर रिक्षांच्या अनियंत्रित कारभारामुळे प्रवासी व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. स्टेशन परिसरात रिक्षा उभ्या करण्यासाठी कोणतीही निश्चित जागा नसल्याने पादचारी मार्ग व वाहनांच्या ये-जा मार्गांवर रिक्षा उभ्या राहत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, पीक अवर्समध्ये परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी काही रिक्षाचालक जोरजोरात ओरडत हुज्जत घालत असून, भाड्याबाबत मनमानी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या प्रकारामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच रोज कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. ये-जा करणाऱ्या बस गाड्यांनाही रिक्षांच्या गर्दीमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र रोज दिसून येत आहे.
या गंभीर समस्येबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी डेप्युटी आरटीओ अधिकारी, एमएच-४३ वाशी, नवी मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत बेकायदा शेअर रिक्षा थांबे, भाड्याची मनमानी, प्रवाशांना होणारा त्रास व वाहतूक अडथळ्यांचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. नेरूळ स्टेशन हे नवी मुंबईतील महत्त्वाचे जंक्शन असल्याने येथे वाहतूक शिस्त व रिक्षा व्यवसायावर तातडीने नियंत्रण आणावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकट
कारवाईची गरज
नेरूळ स्टेशन (पूर्व) परिसरात उलवे शेअर रिक्षांसाठी निश्चित थांबा, ठरावीक भाडेदर व कडक वाहतूक शिस्त लागू न झाल्यास प्रवाशांचा त्रास वाढतच जाणार असून, आरटीओ, वाहतूक पोलिस व स्थानिक प्रशासनाने तातडीने संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Alphonso mango : रत्नागिरी हापूस आता एआय तंत्रज्ञानावर; मोबाईल ॲपवरून बागेचे व्यवस्थापन होणार, हापूस शेतीत डिजिटल क्रांती

'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक सुरू

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

SCROLL FOR NEXT