मुंबई

ठाण्यात ‘अग्निवर्ष’

CD

ठाण्यात २०२५ ‘अग्निवर्ष’
६६६ आगी, १२ मुक्या जीवांचा होरपळून मृत्यू
पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ (वार्ताहर) : २०२५ हे वर्ष ठाणे शहरासाठी ‘अग्निवर्ष’ ठरल्याचे चित्र आहे. वर्षभरात शहरात तब्बल ६६६ आगीच्या घटनांची नोंद झाली असून, या आगीमध्ये १२ मुक्या जीवांना होरपळून प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय एका घटनेत धुरामध्ये अडकलेल्या एका महिलेचा गुदमरून मृत्यू झाला आहे; मात्र या संकटांमध्ये अडकलेल्या हजारो ठाणेकरांना मृत्यूच्या दारातून सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
मुंबईच्या जवळ असल्यामुळे ठाणे शहराला नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. परिणामी, शहरात वेगाने नागरीकरण वाढत असून गगनचुंबी इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वातानुकूलित यंत्रसामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या नोंदीनुसार, वर्षभरात ६६६ आगीच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यातील चार महिन्यांत आगीची सरासरी संख्या सुमारे २५ इतकी होती; मात्र उन्हाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांत आगीच्या घटनांना मोठा भडका बसल्याचे दिसून आले. या कालावधीत तब्बल ३०९ लहान-मोठ्या आगीची नोंद झाली आहे.
या घटनांपैकी एका आगीत एका महिलेचा धुरामुळे मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले असून, ४६३ जणांना मृत्यूच्या दारातून सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. याच कालावधीत विविध आगीच्या घटनांमध्ये १२ मुक्या जीवांचा मृत्यू झाला असून, एका मुक्या जीवाला यशस्वीपणे रेस्क्यू करून जीवदान देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आगीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी विद्युत उपकरणांचा वापर करताना दक्षता घ्यावी, इमारतींमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.

आगीच्या घटनेबाबत कॉल येताच, शक्य तितक्या लवकरात लवकर अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घटनास्थळी धाव घेतली जाते. या घटनांमुळे अडकलेल्या ठाणेकरांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी नेण्यात येते. त्याचबरोबर सुखरूप बाहेर असल्याची जाणीव करून त्यांना धीरही दिला जातो. तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाते.
- यासीन तडवी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

आगीची आकडेवारी
महिने संख्या
जानेवारी ७८
फेब्रुवारी १०६
मार्च ११९
एप्रिल ८४
मे ३६
जून २६
जुलै २५
ऑगस्ट २५
सप्टेंबर २४
ऑक्टोबर ६५
नोव्हेंबर ४३
डिसेंबर ३२
एकूण ६६६

लग्नाचे बाराशे वऱ्हाडी बचावले
ठाणे घोडबंदर रोड परिसरात लग्नाचा रिसेप्शन कार्यक्रम सुरू असताना आग लागली होती. या आगीवर तब्बल सव्वातासाने नियंत्रण मिळविण्यात आले. आग लागल्याचे समजताच सुरक्षेच्या दृष्टीने अंदाजे १,००० ते १,२०० वऱ्हाड्यांनी वेळीच काढता पाय घेतल्याने ते थोडक्यात बचावले. कार्यक्रमस्थळी असलेल्या मंडप डेकोरेशन साहित्याला आग लागली व त्या आगीने क्षणात भीषण रूप धारण केले होते.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच उमेदवार ३ पक्षांकडून करत आहे अर्ज!

Latest Marathi News Live Update: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी वन आणि खाण विभागाची आढावा बैठक घेतली

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT