मुंबई

मिरा भाईंदरचा तिढा सोडविण्यासाठी निर्णय

CD

महायुतीच्या जागावाटपासाठी समन्वय समिती
मिरा-भाईंदरचा तिढा सोडविण्यासाठी निर्णय
भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेत जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या समितीची घोषणा केली आहे. त्यात भाजप व शिवसेना नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, समन्वय समितीच्या स्थापनेनंतरही जागावाटपाचा तिढा सुटणार का, याबाबत शंका व्यक्त होत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असले, तरी मिरा-भाईंदरमध्ये भाजप व शिवसेनेत युती होईल की नाही याबाबत साशंकता आहे. तिढा सोडविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन्ही पक्षांची समन्वय समिती घोषित केली आहे. त्यात भाजपकडून आमदार नरेंद्र मेहता, मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष दिलीप जैन व ॲड. रवी व्यास, तर शिवसेनेकडून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के व जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांचा समावेश करण्यात आला आहे.

घोडे पुढे सरकलेले नाही
९५ जागांपैकी भाजपला ६५ जागा हव्या आहेत. त्यांनी शिवसेनेला १७ जागा देऊ केल्या आहेत. मात्र, जागावाटपाचे हे सूत्र शिवसेनेला अमान्य आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेला ५० टक्के जागा हव्या असल्याचे ठामपणे सांगितले आहे, तर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता ६५-१७ च्या प्रस्तावावर ठाम आहेत. त्यामुळे युतीचे घोडे पुढे सरकलेले नाही.

उपरोधिक टिप्पणी
मात्र प्रताप सरनाईक यांनी जागावाटपाची चर्चा स्थानिक भाजपच्या नेत्यांशी न करता केवळ राज्यस्तरीय नेत्यांशीच करू, अशीही भूमिका यापूर्वीच जाहीर केली होती. त्यावर नरेंद्र मेहता यांनीही आपण लहान कार्यकर्ते असून, सरनाईक यांनी वरिष्ठ पातळीवरच चर्चा करावी, अशी उपरोधिक टिप्पणी केली होती. दोन्ही नेत्यांमध्ये ताणले गेलेले संबंध लक्षात घेता जागावाटपाच्या चर्चेसाठी हे दोन्ही नेते एकत्र बसणार का व आपापल्या भूमिका बाजूला ठेवून सकारात्मक चर्चा करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे समन्वय समिती स्थापन करण्याचा उद्देश सफल होणार की जागावाटपाचा तिढा कायम राहणार याचे उत्तर मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT