कुणबी भवन तळ्याचे आज उद्घाटन
तळा, ता. २७ (प्रतिनिधी) : तळा तालुक्यातील भव्य कुणबी भवनाचे उद्घाटन रविवारी (ता. २८) दुपारी ३ वाजता होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमास महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अध्यक्षस्थानी तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष नामदेव काप असतील. स्वागताध्यक्ष यशवंत शिंदे आहेत. या वेळी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुणबी समाज कार्यकारिणीने केले आहे.