मुंबई

घराणेशाहीचा वाद चिघळणार

CD

घराणेशाहीचा वाद चिघळणार
खासदार पुत्राला विरोध; शिंदे गटाचे टेन्शन वाढले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : घराणेशाहीविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पेटवलेली ठिणगी आता थेट खासदार नरेश म्हस्के यांच्या दारापर्यंत पोहोचली आहे. ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार होण्यापूर्वी नगरसेवक म्हणून ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व नरेश म्हस्के करीत होते, त्या प्रभागातून त्यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र याला शिंदे गटातूनच उघड विरोध होऊ लागल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे.

काही दिवसांपूर्वी भोईर कुटुंबाविरोधात असेच एक बंड मनोरमानगर येथे उघडकीस आले. विरोध करणाऱ्या आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या शाखाप्रमुखाला शिंदे गटाने शिस्तभंगाची कारवाई करीत बाहेरचा रस्ता दाखवला. अशावेळी त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी थेट महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देत नाराजीची पहिली ठिणगी पेटवून दिली. आता त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले असले तरी हे लोन अनेक प्रभागांमध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. असाच एक प्रकार शनिवारी रात्री कोपरी आनंदनगर येथे घडल्याने थेट खासदार नरेश म्हस्के यांना आव्हान ठरले आहे.

नरेश म्हस्के हे शिवसेना एकसंध असताना कोपरीतील आनंदनगर भागातून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत होते. महापौरपद भूषविल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांनी शिंदे गटाची बाजू भक्कम घेतली आणि खासदार म्हणून निवडूनही आले. त्यानंतर या प्रभागातील जागा रिक्त झाल्याने उमेदवारीसाठी अनेक इच्छुक सक्रिय झाले. याच पार्श्वभूमीवर खासदार यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळताच वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसते. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे खंदे समर्थक आणि कार्यकर्ते प्रमोद गोगावले यांचाही यामध्ये समावेश आहे. त्यांच्या समर्थकांनी गोगावले यांना यंदा उमेदवारी मिळावी यासाठी थेट रस्त्यावर उतरून मागणी केली आहे.

आपण गेली २५ वर्षे प्रभागात काम करीत असल्याचा दावा इच्छुक प्रमोद गोगावले योनी केला आहे. गेल्या दोन वेळा वरिष्ठांसाठी आपण इच्छुक असूनही माघार घेतली. मग आता तरी संधी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात गैर काय आहे, असे ते म्हणाले. आपण पक्षाकडे इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला आहे. आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, पण माझ्या कामाची दखल घेतली जावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये असंतोष
शिंदे गट आणि भाजप यांच्यातील जागावाटपाची रस्सीखेच अद्याप सुरूच आहे. त्यातच अनेक माजी नगरसेवक आपल्या मुलामुलींना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याच्या तयारीत असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत आहे. हा असंतोष आता उघडपणे व्यक्त होऊ लागल्याने ठाण्यात मोठ्या प्रमाणात बंड होण्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT