मुंबई

आज दुपारपर्यंत एबी अर्जाची मुदत

CD

पनवेल, ता. २९ (बातमीदार) : पनवेल महापालिकेची तब्बल आठ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत एबी अर्ज जोडण्यासाठी उद्या मंगळवारी (ता. ३०) दुपारी ३ वाजेपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गुपचूप एबी अर्ज वितरित केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक पक्ष शेवटच्या दिवशीच उमेदवारांची यादी जाहीर करून संभाव्य बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड वाढली असून, त्यामुळे बंडखोरी टाळणे हे पक्षनेतृत्वापुढील मोठे आव्हान ठरले आहे. उमेदवारी जाहीर करण्यात होत असलेला विलंब, रुसवे-फुगवे आणि अंतर्गत नाराजी यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी कोणताही धोका पत्करू नये, म्हणून विशेष काळजी घेतली आहे. अर्ज बाद होऊ नये, यासाठी अनेकांनी एक डमी अर्ज, एक अपक्ष अर्ज आणि एक पक्षाचा अर्ज असा ‘फॉर्म्युला’ अवलंबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अर्ज विक्री व दाखल करण्याच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. उद्याचा दिवस अर्ज भरण्यासाठी शेवटचा असल्याने वातावरणात चांगलीच धावपळ पाहायला मिळत आहे. मात्र, अद्यापही अनेक पक्षांनी अधिकृत उमेदवारी जाहीर न केल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

युती व आघाड्यांची गणिते मोठ्या प्रमाणात जुळलेली असली तरी स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर आहे. अनेक इच्छुकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली असून, संयम सुटलेल्या काही इच्छुकांनी इतर पक्षांकडून उमेदवारीचे पक्के आश्वासन घेत पक्षांतर केल्याचे चित्रही या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

बुधवारपासून उमेदवारी अर्जांची छाननी
एबी अर्ज वेळेत दाखल न झाल्यास उमेदवारी बाद होण्याचा धोका असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. बुधवारी (ता. ३१) सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. उमेदवारी माघारीनंतर निवडणूक रिंगणाचे स्पष्ट चित्र समोर येणार असून, त्यानंतरच प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महापालिका निवडणूक राजकारण अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: धुरंधरच्या गाण्यावर पाकिस्तानी महिला पोलिसाचा तुफान डान्स; वर्दीवरचा व्हिडीओ व्हायरल

BMC Election: स्थगितीच्या सावलीत उमेदवारी! उघड नाराजी, तरी बॅकडोअर एन्ट्री! भाजपचा थरवळांसाठी खास डाव

BMC Election: 'आश्वासनं फसवी ठरली...'! डबेवाला संघटनेची उद्धव ठाकरेंवर नाराजी; महायुतीला पाठिंबा देत सत्ता बदलाचा इशारा

Vijay Hazare Trophy: १५ चौकार, ८ षटकार अन् दीडशतक... ध्रुव जुरेलची विस्फोटक खेळी, रिकू सिंगनेही साथ देत ठोकली फिफ्टी

Latest Marathi News Live Update : ४२ लाखांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT