सम्राट अशोक विद्यालयात विज्ञान रांगोळी प्रदर्शन
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय, सेंट वाय. सी. इंग्लिश स्कूल व विपश्यना बालविहार या शाळांमध्ये दोन दिवसीय रांगोळी आणि विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून पूजा काळे, उद्योगपती रमेश गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय उपस्थित होते.
पूजा काळे यांनी ४५ सेंकदात रांगोळी काढून जागतिक विक्रम केला आहे. कार्यक्रमाप्रसंगी पुन्हा ही रांगोळी साकारून पूजा यांनी विद्यार्थी व पालकांचे लक्ष वेधले. पूजा काळे आपल्या मनोगतात म्हणाल्या, मी एक शेतकरी परिवारातील आहे. माझे पतीही शेतकरी आहेत. मला माझ्या वडिलांकडून रांगोळीचे मार्गदर्शन मिळाले. दृढ विश्वास, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आणि परिवाराने दिलेली साथ म्हणूनच मी जागतिक विक्रम करू शकले. मुलांनो तुम्ही सुद्धा आयुष्याचे ध्येय समोर ठेवा आणि आपल्याला आवडणाऱ्या कलेतून पुढे जा, असे त्यांनी सांगितले.
प्रदर्शनात ठेवलेले प्रकल्प आणि रांगोळी यामधून माध्यम व विभाग निहाय प्रथम, द्वितीय क्रमांक काढले. निरीक्षक म्हणून सहशिक्षक दिलीप गायकर, संजय वाघ व दिपाली इंगळे यांनी काम पाहिले. शाळेचे पालक, विद्यार्थी व परिसरातील पालकांनी प्रदर्शन पाहत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.