मुंबई

- केणी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पुरस्कृत

CD

प्रमिला केणी राष्ट्रवादी पुरस्कृत
ठाण्यात शरद पवार गटाकडून बिनशर्त पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे पालिकेच्या २०१७मध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांना शिवसेना शिंदे पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारीच्या दिवशी केणी या अर्ज माघारीसाठी गेल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दीपा गावंड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर प्रमिला केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी प्रमिला केणी आणि त्यांचे पुत्र मंदार केणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पालिका निवडणुकीत केणी कुटुंबाला किमान दोन तिकिटे मिळतील अशी अशा होती. मात्र उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशी पक्षश्रेष्ठींनी दोघांपैकी एकालाच तिकीट देण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे प्रमिला केणी यांनी २३ ब मधून अपक्ष अर्ज दाखल केला होता.
----
विजय निश्चित
अर्ज माघारीच्या दिवशी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार अर्ज माघारी घेण्यासाठी गेल्या असता, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केणी यांची भेट घेतली. अर्ज माघारी न घेण्यास सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला. केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा देत पुरस्कृत उमेदवार असल्याचे जाहीर करीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनोज प्रधान यांनी व्यक्त केला.

चर्चेचा विषय
प्रमिला केणी यांचे पुत्र मंदार केणी हे शिवसेनेतर्फे २३ मधून निवडणूक लढवत आहेत. तर प्रमिला केणी अपक्ष शरद पवार गटाच्या पाठिंब्याने रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २३ ‘ब’मधून प्रमिला केणी, तर प्रभाग क्रमांक २३ ‘ड’मधून मंदार केणी निवडणूक लढवत आहेत. आई-मुलगा आमनेसामने आल्याने हा सामना केवळ राजकीयच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील ठरण्याची शक्यता असून, ठाणे महापालिका निवडणुकीतील ही लढत चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT