मुंबई

आता प्रचाराचा धुरळा

CD

आता शिलेदारांची कसोटी
माघारी, बिनविरोध नाट्यानंतरही चुरशीची लढत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ ः अंतिम क्षणापर्यंत ताणलेले जागावाटप, आयत्या वेळी दिले गेलेले एबी फॉर्म, त्यानंतर उडालेला गोंधळ, उमेदवारी अर्जांचा पाऊस आणि अर्ज बाद करण्यापासून ते माघारीपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता खऱ्या अर्थाने पालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. त्यात उद्या रविवार असल्याने आणि त्यानंतर अवघे १० दिवस हाती असल्याने प्रचाराला वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यासह कल्याण- डोेंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी पालिकेच्या रणसंग्रामात किती शिलेदार लढत देणार आहेत, त्याचा आढावा...

ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ६४९ उमेदवार
१२४ जागांसाठी होणार लढत
ठाणे, ता. ३ ः ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नऊ प्रभाग समित्यांमधून दाखल झालेल्या एकूण १,१०७ नामनिर्देशनपत्रांपैकी छाननी व माघारीनंतर अखेर ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये २६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान, सात ठिकाणी प्रतिस्पर्धीच नसल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता ३३ प्रभागांतील १३१ नव्हे तर १२४ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

३० डिसेंबरपर्यंत १,१०७ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. त्यापैकी ९१८ अर्ज वैध ठरवण्यात आले. यामध्ये विरोधी पक्षातील अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यानंतर १ व २ जानेवारी या दोन दिवसांत अनेक प्रभागांमध्ये लढत बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न होताना दिसले. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीमध्ये २६९ उमेदवारांनी मैदान सोडले. माघारीनंतर सर्वाधिक उमेदवार माजिवडा-मानपाडा, लोकमान्य सावरकरनगर आणि कळवा प्रभाग समितीत असून, काही प्रभागांमध्ये लढत तुलनेने कमी उमेदवारांमध्ये होत असल्याचे चित्र आहे.

प्रभाग समितीनिहाय उमेदवारांची आकडेवारी ः

माजिवडा-मानपाडा- ९२ वर्तकनगर ६५, लोकमान्य सावरकरनगर- ८३, वागळे- ३६, नौपाडा-कोपरी- ५२, उथळसर- ५०, कळवा- ८२, मुंब्रा (प्रभाग २६-३१)- ३९, मुंब्रा (प्रभाग ३०-३२)- ५७, दिवा (प्रभाग २७-२८)- ४२, दिवा (प्रभाग २९-३३)- ५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

शिक्षणाधिकाऱ्यांचाच अभ्यास कच्चा, आदेशाचा चुकीचा अर्थ काढला; राज्यात शिक्षकांना दिल्या कुत्रे मोजण्याच्या सूचना

T20 World Cup 2026 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; रोहित शर्माचा मित्र कर्णधार, एकाच डावात १९ सिक्स मारणाराही फलंदाजही परतला

Asaduddin Owaisi:‘१५ मिनिटां’चा इतिहास आहे, १५ तारखेला पुन्हा इतिहास घडवा: खासदार असदुद्दीन ओवेसी; राजकारणात नवा अध्याय लिहा!

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती, कमळाला हाताचा आधार; शिवसेना शिंदे गट विरोधी बाकावर

SCROLL FOR NEXT