मुंबई

खोपोलीतील उपजिल्हा रुग्णालय दर्जेदार असणार- नगराध्यक्ष कुलदीप शेंडे

CD

खोपोलीतील उपजिल्हा रुग्णालय दर्जेदार असणार ः नगराध्यक्ष कुलदीप शेंडे
खालापूर, ता. १० (बातमीदार) ः खोपोलीतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारताच थेट उपजिल्हा रुग्णालय आणि नाट्यगृहाच्या प्रश्नाला हात घातला आहे. रुग्णांची परवड थांबण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासाठी युद्धपातळी प्रयत्न करणार शेंडे यांनी सांगितले.
खोपोलीच नव्हे तर संपूर्ण तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला उपजिल्हा रुग्णालयाचा विषय अद्याप मार्गी लागलेला नाही. खालापूर तालुक्यातील ४४ ग्रामपंचायती, एक नगरपंचायत आणि खोपोलीसारखी श्रीमंत नगरपरिषद असताना देखील आपत्कालीन परिस्थितीत उपचार होतील, असे सरकारी आणि खाजगी रुग्णालय देखील उपलब्ध नसल्याने कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. तर, खोपोली नगरपरिषद रुग्णालय, खालापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चौक येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मर्यादित स्वरूपात उपचार होतात. रुग्णावर तातडीने शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्ण असल्यास तालुक्यात उपचाराची सोय नसल्याने मुंबई व पुणे धावपळ करावी लागते. या परवड थांबण्यासाठी कुलदीपक शेंडे यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी युद्धपातळी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालयापेक्षा वेगळे आणि सर्व सोयींनी सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय खोपोलीत तयार करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. सीएसआर फंड आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या सहकार्याने नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल त्यासाठी प्रयत्न असतील.
- कुलदिपक शेंडे, नगराध्यक्ष, खोपोली

**फोटो- नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि सर्व नगरसेविका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT