मुंबई

लोकशाही बळकटीकरणाचा निर्धार

CD

लोकशाही बळकटीकरणाचा निर्धार
ठाण्यात सायकलप्रेमींकडून मतदानाचा जागर
ठाणे, ता. ११ : निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांच्या ''बाईक रॅलीने ठाणे शहर दुमदुमत आहे; मात्र ठाण्यातील सायकलप्रेमींनी लोकशाही बळकट करण्यासाठी रस्त्यावर उतरून अनोखा संदेश दिला. ''माझे ठाणे, माझी लोकशाही; टिकवीन मी लावून बोटाला शाई'' अशा घोषणांनी शनिवारी ठाणे शहर दुमदुमले.

ठाणे महापालिका आणि ''आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन'' यांच्या संयुक्त विद्यमाने या मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका मुख्यालयासमोर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. रॅलीच्या प्रारंभी सर्व उपस्थित सायकलप्रेमी आणि नागरिकांना लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाची शपथ देण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व गणेश कोळी, दिलीप तळेकर, अमोल कुळकर्णी, सुनील रोकडे, ज्ञानदेव जाधव, निखिल शिवलकर, चंद्रशेखर जगताप आणि विठ्ठल कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन प्रज्ञा म्हात्रे यांनी केले. राजकीय रॅलींच्या कोलाहलात सायकलस्वारांनी शांततेच्या मार्गाने दिलेला हा मतदानाचा संदेश ठाणेकरांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

रॅलीचा मार्ग
महापालिका मुख्यालय – नितीन जंक्शन – तीन हात नाका – हरिनिवास सर्कल – नौपाडा पोलीस स्टेशन – शाहू मार्केट – गोखले रोड – राम मारुती रोड – अल्मेडा सिग्नल आणि पुन्हा महापालिका मुख्यालय, अशी रॅली काढण्यात आली. सायकलवर लावलेले जनजागृतीचे फलक आणि ''सुशासन आणूया'' अशा घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT