मुंबई

कल्याण-डोंबिवलीत मतदान जनजागृती

CD

कल्याण-डोंबिवलीत मतदान जनजागृती
महापालिकेचे स्वाक्षरी अभियान
कल्याण, ता. १२ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, या उद्देशाने पालिकेच्या ‘स्वीप’ टीममार्फत सोमवारी मनपा मुख्यालयात भव्य स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात एक फलक उभारण्यात आला होता. या फलकावर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्वप्रथम ‘आय विल व्होट’ असे लिहून स्वाक्षरी केली आणि मोहिमेची सुरुवात केली. आयुक्तांनंतर अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून मतदानाचा संकल्प केला. या वेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, मनपा सचिव किशोर शेळके, निवडणूक उपआयुक्त समीर भुमकर, ‘स्वीप’चे समन्वय अधिकारी संजय जाधव, उपआयुक्त कांचन गायकवाड, रामदास कोकरे, अतिरिक्त शहर अभियंता जगदीश कोरे यांच्यासह कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी आणि ‘स्वीप’चे सहाय्यक नोडल अधिकारी विजय सरकटे उपस्थित होते.

दुहेरी संकल्प
सोमवारी ‘राष्ट्रीय युवा दिन’ असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या वेळी दोन महत्त्वाच्या प्रतिज्ञा घेण्यात आल्या :
१. मतदान जनजागृती : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदान करण्याची शपथ घेतली.
२. नशामुक्त भारत : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार, युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अमली पदार्थविरोधी शपथ घेण्यात आली. पालिका प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अशा विविध माध्यमांतून नागरिकांना आवाहन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निवडणूक की लिलाव? १५ कोटींची ऑफर, तरीही नकार! पैसे वाटपावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

सोलापुरातील धक्कादायक घटना! रिमांड होममधून अल्पवयीन मुलगा, तर घरगुती वादातून सखी वन टॉप सेंटरमध्ये आलेली विवाहिता बेपत्ता; पोलिस घेत आहेत दोघांचा शोध

Mumbai Politics: आरोप, वस्तुस्थिती आणि राजकीय संदर्भ... मुंबई खरंच विकली जातेय का? अदानी समूहावर बोट; पण वास्तव काय सांगतं?

Puja Khedkar Robbery : पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर मध्यरात्री दरोडा; नोकरानेच आखला कट!

Cricket Retirement: डिव्हिलियर्सला पहिल्याच सामन्यात बाद करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा; १२०+ विकेट्स नावावर

SCROLL FOR NEXT