मुंबई

पेणमध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम

CD

पेणमध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम
पोलिस, परिवहन विभागासह शाळा-महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग
पेण, ता. १२ (वार्ताहर) : १ जानेवारीपासून सुरू झालेल्या पोलिस प्रशासनाच्या रेझिंग डे आणि रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पेण तालुक्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानात पेण पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस, उपप्रादेशिक परिवहन विभागासह शाळा व महाविद्यालयांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला आहे. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत रस्ता सुरक्षा व कायद्याबाबत जागृती करण्यावर भर देण्यात आला आहे.
रेझिंग डे निमित्त पोलिस ठाण्यात शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांकडून शस्त्रांची माहिती, पोलिस कार्यपद्धती तसेच कायदा-सुव्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पोलिस दलाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. दरम्यान, रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक पोलिस व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये वाहतुकीचे नियम, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, तसेच गुन्हेगारी व सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देण्यात आली. पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वाहने चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. सध्या दंडात्मक कारवाई वाढविण्यात आलेली असून नियम मोडल्यास मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते. यासोबतच सायबर गुन्ह्यांबाबत सजग राहण्याचे आवाहन करत, कोणतीही संशयास्पद घटना किंवा गुन्हा घडताना दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. आपत्कालीन क्रमांक ११२ तसेच सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० यांची माहितीही यावेळी देण्यात आली.
....................
वाहतूक नियम मोडल्यास दंड (रुपये):
• हेल्मेट न वापरल्यास – १०००
• अल्पवयीन वाहनचालक (पालक व मालक) – १०००
• ट्रिपल सीट – १०००
• परवाना नसताना वाहन चालविणे – ५०००
• वाहन चालविताना मोबाईल वापर – चारचाकी ४०००, दुचाकी २०००
• अडथळा निर्माण करून पार्किंग – ५०० ते १५००
• मद्यप्राशन करून वाहन चालविणे – १०००० (परवाना रद्द)
• अतिवेग – २०००
• मोठ्या आवाजाचा सायलेन्सर – १००००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : "होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Devendra Fadnavis : "अजित दादांनी शब्द पाळला नाही"; पुण्याच्या मैत्रिपूर्ण लढतीवरून देवेंद्र फडणवीसांची उघड नाराजी!

मोठी बातमी! प्रचार तोफा थंडावताच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा, कारण काय?

Thane News: ठाणे पालिका निवडणूक यंत्रणा सज्ज! १६ लाख मतदार बजावणार हक्क; दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

SCROLL FOR NEXT