पालिका निवडणुकीसाठी १० हजार पोलिसांचा फौजफाटा
ड्रोनची नजर; पोलिस यंत्रणा सज्ज
ठाणे, ता. १३ (सकाळ वृत्तसेवा): ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. ही प्रक्रिया शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाने कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुन्हेगारांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.
आचारसंहितेचा भंग रोखण्यासाठी संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत निगराणी ठेवली जात आहे. मतदानाच्या दिवशी संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची विशेष नजर असेल. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित धरपकड व तपासणी सुरू आहे. तणावग्रस्त आणि संवेदनशील भागात ''रूट मार्च'' व ''एरिया डॉमिनेशन'' करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली जात आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात केले आहे.
निर्भयपणे मतदानाचे आवाहन
निवडणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आणि न घाबरता लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन आपले मतदान करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असा असेल पोलिस बंदोबस्त
तैनात घटक संख्या / संख्याबळ
पोलीस अधिकारी व अंमलदार १०,९०८
होमगार्ड ६,२९५
एसआरपीएफ ६ कंपन्या व १ प्लाटून
आकडेवारी
परिमंडळ पोलिस होमगार्ड
ठाणे १,५९१ १,४००
भिवंडी १,२३२ १,१००
कल्याण १,८२० १,५४५
उल्हासनगर ८०० १,०५०
वागळे इस्टेट १,३७१ १,२००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.