सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : पनवेल महापालिका परिसरात प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशासनाने वेगळी तयारी केली असून, मतदारांचे स्वागत केले जाणार आहे. हिरवा, गुलाबी आणि आदर्श मतदान केंद्रे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पनवेल महापालिका आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची सज्जता नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. मतदानास सर्व पात्र मतदारांनी येऊन निर्भयतेने मतदान करावे, तसेच ग्रीन, पिंक आणि आदर्श मतदान केंद्रासह महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानास नक्की या, आपले स्वागत आहे, असा संदेश महापालिकेतर्फे देण्यात येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील २० प्रभागांमध्ये २४६ उमेदवारांसाठी ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनेल पद्धतीने होत आहे. प्रभाग क्रमांक ११ व २० मध्ये अ, ब, क अशा तीन जागांसाठी, तर इतर प्रभागांमध्ये अ, ब, क, ड अशा चार जागांसाठी नागरिकांना मतदान करायचे आहे. प्रत्येक विभागामध्ये गुलाबी रंगाचे एक महिला विशेष सखी मतदान केंद्र, तसेच हिरव्या रंगाचे पर्यावरणपूरक आदर्श मतदान केंद्र उभारण्यात येत आहे.
महापालिका निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष व शांततेत होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्यरत रहावे, अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे व निवडणूक निरीक्षक मनीषा कुंभार यांच्यामार्फतही निवडणूकविषयक कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पनवेलमध्येही शिवसेना-भाजप महायुतीची महाविकास आघाडीसोबत थेट लढत होत आहे. पनवेलमध्ये ७८ जागांपैकी सहा जागांवर भाजपच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे पनवेल महापालिका निवडणुकीत आता ७१ जागांवर खरी लढत होणार आहे.
मतदानाचे नियोजन
- निवडणुकीसाठी सहा विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन असून, त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्याचे वितरण व संकलन केले जाणार आहे.
- निवडणुकीकरिता एकूण ६५६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. गुरुवारी सकाळी ७.३० ते ५.३० दरम्यान मतदान होणार आहे.
- सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था असून, मदतीसाठी स्वयंसेवकही कार्यरत असणार आहेत.
- मतदान केंद्रांवरील कामकाजासाठी मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व शिपाई अशा एकूण ४,१२५ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
मतदान यंत्रे तपासणी पूर्ण
निवडणुकीसाठी ८९७ अधिक कंट्रोल युनिट व १,९१२ बॅलेट युनिट प्राप्त झाली आहेत. सर्व मतदान यंत्रे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतील सहा स्ट्राँग रूममध्ये कडक पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
मतदार ५,५४,५७८
पुरुष २,९४,८२१
महिला २,५९,६८५
कंट्रोल युनिट ८९७
बॅलेट युनिट १,९१२
मतदान केंद्रे ६५६
कर्मचारी ४,१२५
गुलाबी मतदान केंद्र कारमेल कॉन्वेट स्कूल (कळंबोली)
हिरवा मतदान केंद्र सेंट जोसेफ स्कूल (नवीन पनवेल)
आदर्श मतदान केंद्र बाल भारती पब्लिक स्कूल (खारघर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.