मुंबई

आजपासून सीईटीच्या नोंदणीला सुरूवात

CD

आजपासून ‘सीईटी’च्या नोंदणीला सुरुवात
मुंबई, ता. १३ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी.एचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग्रेटेड)/एमसीए (इंटिग्रेटेड) या सात अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीला बुधवारी, १४ जानेवारीपासून सुरुवात होत असून ही नोंदणी १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमएचटी सीईटी पीसीएम व पीसीबी समूह, एमबीए,एमएमएस, एमसीए, ३ व ५ वर्षीय एलएलबी, बी. एड., एमएड, बीएड-एमएड (३ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम), एम.पी.एड., एम. एचएमसीटी या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. तर बी. डिझाईन, एएसी (फाईन आर्ट्स ), डीपीएन/पीएचएन (वैद्यकीय) व नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीसही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

X Outage : जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ठप्प! लाखो युजर्सना फटका

'Virat Kohli भारतासाठी अजून ५-६ वर्षे खेळू शकतो', दिग्गज खेळाडूचा मोठा दावा; वाचा सविस्तर

Pune Crime : धामणे तिहेरी हत्याकांड; मावळ हादरवणाऱ्या दरोड्यातील १० नराधमांना जन्मठेप!

Ajit Pawar : "होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

SCROLL FOR NEXT