मुंबई

‘बेस्ट’ निवडणूकीसाठी सज्ज

CD

‘बेस्ट’ निवडणुकीसाठी सज्ज
१,०२३ बस तैनात; ‘एसटी’च्या १०१ गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाने सार्वजनिक वाहने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शहर व उपनगरांत धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या तब्बल १,०२३ बस निवडणूक कामासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. तर खासगी १,१६० बस आणि एसटीच्या १०१ बस निवडणुकीसाठी सज्ज असणार आहेत. परिणामी १३ ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबईतील प्रवासी बससेवेवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

निवडणूक केंद्रांवर ईव्हीएम मशिन, मतदान साहित्य तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी बेस्टच्या बसचा वापर केला जाणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित प्रभागांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागामार्फत ही वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. १३ जानेवारीच्या रात्रीपासून १५ जानेवारीच्या रात्रीपर्यंत या बस निवडणूक सेवेच्या कामात कार्यरत राहणार आहेत. बेस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भाडेतत्त्वावरील बसचे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित केले जात आहेत. निवडणूक व त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण होताच या सर्व बस तातडीने पुन्हा बेस्ट उपक्रमाकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. या बससोबत बेस्टचे चालक असतील; मात्र कंडक्टरची गरज नसल्याने त्यांची नियुक्ती करण्यात येणार नाही, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. दरम्यान, निवडणूक सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर बस उपलब्ध करून दिल्याने मुंबईकर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील लोकसभा निवडणुकीवेळी उन्हाळ्याचा काळ आणि प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याने फारसा फरक प्रवासी सेवेवर जाणवला नव्हता; मात्र यावेळी खासगी कार्यालयांतील कर्मचारी, रोजचे बेस्ट प्रवासी यांना कमी बस, गर्दीचा सामना करावा लागू शकतो.

अशा आहेत गाड्या निवडणूक सेवेत
खासगी बस ११६०
बेस्ट (सामान्य) १,०२३
एसटी १०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

X Outage : जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ठप्प! लाखो युजर्सना फटका

'Virat Kohli भारतासाठी अजून ५-६ वर्षे खेळू शकतो', दिग्गज खेळाडूचा मोठा दावा; वाचा सविस्तर

Pune Crime : धामणे तिहेरी हत्याकांड; मावळ हादरवणाऱ्या दरोड्यातील १० नराधमांना जन्मठेप!

Ajit Pawar : "होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

SCROLL FOR NEXT