मुंबई

बनावट एटीएम कार्डद्वारे लाखोंची आर्थिक फसवणूक उघड

CD

बनावट एटीएम कार्डद्वारे लाखोंची आर्थिक फसवणूक उघड
कल्याण, ठाणे, नवी मुंबईत सक्रिय टोळीचा पर्दाफाश ः तिघांना अटक
टिटवाळा, ता. १४ (वार्ताहर) : बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. विविध बँक खात्यांमधून बेकायदेशीरपणे रक्कम काढून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या या टोळीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार, आरोपी बनावट एटीएम कार्ड तयार करून त्याचा वापर विविध एटीएम केंद्रांवरून परस्पर खात्यांमधून रक्कम काढत होते. या फसवणुकीत आतापर्यंत हजारो नव्हे तर लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे कल्याण, ठाणे, नवी मुंबई, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या भागांतील अनेक एटीएम केंद्रांवरून ही रक्कम काढण्यात आल्याने या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कल्याण तालुक्यातील आणि ठाणे व मुंबईतील व्यक्तींचा समावेश असून, हे आरोपी परस्पर संगनमताने नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवून बनावट एटीएम कार्ड तयार करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या टोळीने विविध बँकांच्या एटीएमचा गैरवापर करून वेगवेगळ्या ठिकाणी पैसे काढल्याची सविस्तर माहिती पोलिसांकडे उपलब्ध झाली आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, विविध बँकांची एटीएम कार्ड, मोबाईल फोन आणि फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणात आर्थिक फसवणुकीची साखळी अधिक मोठी असल्याचा संशय असून, आणखी काही आरोपी या गुन्ह्यात सामील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि बँक व्यवहारांची सखोल तपासणी करून आरोपींचा माग काढला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या सायबर व आर्थिक गुन्ह्यांविरोधात पोलिसांचा पवित्रा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, एटीएम कार्ड, पिन नंबर किंवा बँकिंगविषयक कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये. संशयास्पद कॉल, संदेश किंवा व्यवहार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करावी. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी मोठे आर्थिक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Municipal Election 2026 : मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न? पिंपरी-चिंचवडमध्ये वॉशिंग मशीन, तर नवी मुंबई अन् अमरावतीत पैशांचा बॅगा जप्त

Accident News: भीषण! ट्रक आणि एर्टिगा कारचा भयंकर अपघात; ६ महिलांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूक

Pakistan Cricket: भिकारड्या पाकिस्तानवर वाईट वेळ! क्रिकेट संघ काढला विक्रीला; लिलावाची केली घोषणा

Railway Accident : भीषण दुर्घटना! क्रेन रेल्ववर कोसळली; २२ जणांचा मृत्यू, ३० पेक्षा अधिक जखमी

Tamhini Ghat Crime : ताम्हिणी घाट खून प्रकरणातील फरार आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून बेड्या; लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT