मुंबई

वर्चस्व विरोधात अस्तित्वाची लढाई

CD

वर्चस्वाविरोधात अस्तित्वाची लढाई
जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी आज मतदान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ ः गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम आता अंतिम चरणात आली आहे. उद्या १५ जानेवारीला ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी या सहा महापालिकांंसाठी मतदान होणार असून तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ६२७ पैकी ३२ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित ५९६ नगरसेवकपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप अशी युती आहे. तर नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर या तीन ठिकाणी या दोन्ही सत्ताधारी पक्ष आमनेसामने आहेत. या दोन्ही पक्षांत वर्चस्वाची लढाई असून शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि दोन्ही राष्ट्रवादींचे अस्तित्व पणाला लागले आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ठाणे या एकमेव जिल्ह्यात सर्वाधिक सहा महापालिका आहेत. त्यामुळे मुंबई, पुणेपाठोपाठ संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष ठाण्याकडे लागले आहे. जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी या सहा महापालिका आहेत. त्यापैकी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या तीन महापालिका प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. हजारो कोटींचे बजेट असलेल्या या महापालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. ते या निवडणुकीतही कायम राहिल्याचे दिसून आले. वास्तविक केंद्रात आणि राज्यात महायुती असल्यामुळे जिल्ह्यातील पालिका निवडणुकांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल, अशी अपेक्षा होती; पण यंदाच्या निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गट तर महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडला. नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि उल्हासनगर येथे तर शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढाई उभी राहिली. त्यामुळे सुरुवातीला सरळ भासणाऱ्या पालिका निवडणुकांना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे रंगत चढली.

ठाण्यात सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली
ठाण्यात सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गट आणि भाजपसाठी अनुकूल वातावरण होते. त्यामुळे महायुतीचे उमेदवार अतिआत्मविश्वासात पाहायला मिळाले; पण अर्ज बाद करण्यापासून ते बिनविरोधचा मुद्दा हाती घेऊन शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने वातावरण तापवले. त्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ठाकरे बंधूंच्या सभेमुळे वातावरण आणखी ढवळून निघाले आहे. त्यामुळे ठाण्यात आता महायुतीला बंडखोर, अपक्षांसह ठाकरे सेनेचेही कडवे आव्हान उभे राहिले आहे.

कल्याण-डोंबिवलीत धुसफूस
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती निवडणुकीला सामोरी जात आहे. ठाण्यात भाजपने नमती भूमिका घेतली असली तरी कल्याण-डोंबिवलीत दोन्ही पक्षांमधील धुसफूस सुरूच आहे. त्यामुळे येथे महापौरपदासाठी रस्सीखेच होताना दिसणार आहे. युतीतील पक्षांतर्गत वाद जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत पोहोचला आहे. पैसे वाटपही चव्हाट्यावर आणल्यामुळे येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना भाजप युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी येथे लढत असली तरी खरी लढाई ही शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत आहे.

नवी मुंबईत वाद टोकाला
नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद टोकाला पोहोचला आहे. धक्कादायक खुलासे आणि आरोपांमुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. या पालिकेत दोन्ही पक्षांचे बळ समसमान आहे. त्यामुळे येथे कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटानेही आपली सर्व ताकद येथे लावली आहे. त्यासाठी ठाण्याकडे किंचित दुर्लक्ष करून येथील शिलेदार नवी मुंबईत तळ ठोकून असल्याचेही दिसून आले आहे. नाईक यांच्या संस्थानाला हादरा देण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीही आपले अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मतदार राजा कोणाला साथ देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मिरा-भाईंदर, उल्हासनगरमध्येही चुरस
मिरा-भाईंदर, उल्हासनगर महापालिकांमध्येही युती फिस्कटली आहे. मिरा-भाईंदरवरचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजप शिंदे गटात टक्कर आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि शिंदे गटाचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर उल्हासनगर एकहाती ताब्यात घेण्यासाठी भाजप येथे शिवसेना शिंदे गटाला जोरदार टक्कर देत आहे. या दोघांच्या लढतीत महाविकास आघाडी पिछाडीवर गेली आहे.

भिवंडीत संमिश्र वातावरण
मुस्लिमबहुल क्षेत्र असल्याने भिवंडी महापालिकेचे राजकीय वातावरण संमिश्र झाले आहे. काँग्रेस येथे पुनर्गमनासाठी झटत आहे. सप, एमआयएमने तळ ठोकला आहे. येथे शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत.

महापालिका, सदस्य संख्या
ठाणे- १३१
भिवंडी-निजामपूर- ९०
कल्याण-डोंबिवली- १२२
नवी मुंबई- १११
मिरा-भाईंदर- ९५
उल्हासनगर- ७८
एकूण- ६२७


कुठे, कशी लढत?
ठाणे महापालिका
प्रभाग ३३
पदे १३१
निवडणूक रिंगणात ६४१
शिवसेना शिंदे गट- ८७
भाजप- ४०
शिवसेना ठाकरे गट- ५३
राष्ट्रवादी अजित पवार गट- ६६
काँग्रेस- ६१ अधिक ३ पुरस्कृत
राष्ट्रवादी शरद पवार गट- ६४
मनसे- २३
अपक्ष- ८६


कल्याण-डोंबिवली
प्रभाग- २९
पदे- १२२
निवडणूक रिंगणात- ४८८
शिवसेना शिंदे गट- ७०
भाजप- ५६
मनसे- ३४
शिवसेना ठाकरे गट- ७१
राष्ट्रवादी शरद पवार गट- ३१
राष्ट्रवादी अजित पवार गट- २८
अपक्ष- ९२
इतर- ६०

उल्हासनगर
प्रभाग २०
पदे- ७८
निवडणूक रिंगणात- ४३२
शिवसेना शिंदे गट- ३५
टीओके- ३२
साई पक्ष- ७
भाजप- ७८
मनसे- ११
शिवसेना ठाकरे गट- ४४
काँग्रेस- ३२
राष्ट्रवादी अजित पवार गट- ३२
अपक्ष- ९२
इतर- ६०

भिवंडी-निजामपूर
प्रभाग २३
पदे- ९०
निवडणूक रिंगणात- ४३८
काँग्रेस- ५८
सपा- ५४
भाजप- २६
शिवसेना शिंदे गट- २०
शिवसेना ठाकरे गट- २८
राष्ट्रवादी अ.प. गट- २४
राष्ट्रवादी शरद पवार गट- ३७
एमआयएम- १६
आरपीआय- ८
मनसे- २
अपक्ष- १२१
इतर- ३८


बिनविरोध
ठाणे- ६ (शिवसेना शिंदे गट)
कल्याण-डोेंबिवली- २०
भाजप- १४
शिवसेना शिंदे गट- ६
भिवंडी- ६ (भाजप)
..................................
मतदार
ठाणे
एकूण- १६ लाख ४९ हजार ८६७
पुरुष- ८ लाख ६३ हजार ८७४
महिला- ७ लाख ८५ हजार ८३०

कल्याण-डोंबिवली
एकूण- १४ लाख २५ हजार ८६
पुरुष- ७ लाख ४५ हजार ६६४
महिला- ६ लाख ७८ हजार ८७०

भिवंडी-निजामपूर
एकूण- ६ लाख ६९ हजार ३३
पुरुष- ३ लाख ८० हजार २३
महिला- २ लाख ८८ हजार ९७

उल्हासनगर
एकूण- ४ लाख ३९ हजार ९१२
पुरुष- २ लाख ३२ हजार ७३६
महिला- २ लाख ७ हजार २२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election 2026 : मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न? पिंपरी-चिंचवडमध्ये वॉशिंग मशीन, तर नवी मुंबई अन् अमरावतीत पैशांचा बॅगा जप्त

Accident News: भीषण! ट्रक आणि एर्टिगा कारचा भयंकर अपघात; ६ महिलांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूक

Pakistan Cricket: भिकारड्या पाकिस्तानवर वाईट वेळ! क्रिकेट संघ काढला विक्रीला; लिलावाची केली घोषणा

Railway Accident : भीषण दुर्घटना! क्रेन रेल्ववर कोसळली; २२ जणांचा मृत्यू, ३० पेक्षा अधिक जखमी

Tamhini Ghat Crime : ताम्हिणी घाट खून प्रकरणातील फरार आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून बेड्या; लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT