मुंबई

करदात्यांसाठी आनंदाची बातमी

CD

बदलापूर, ता. १४ (बातमीदार) : थकित मालमत्ता करावर लावण्यात आलेल्या शास्तीमुळे अडचणीत सापडलेल्या बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार कुळगाव-बदलापूर नगर परिषद हद्दीतील थकित मालमत्ता करधारकांना शास्तीमध्ये ५० टक्के माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार थकित मालमत्ता करावरील शास्तीत अर्धी कपात लागू करण्यात येणार आहे. हा निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून लागू राहणार असून, प्रशासनाने ३० दिवसांच्या आत त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहणार आहे. मात्र, ठराविक कालावधीत कर भरणा करणाऱ्या नागरिकांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, शास्तीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक माफी देण्यास स्वतंत्र प्रस्ताव सादर करून सरकारची अंतिम मंजुरी आवश्यक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. करमाफी देताना सरकार निर्णयातील सर्व अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ अपात्र मालमत्ताधारकांना मिळणार नसून, चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रशासनाने लक्ष ठेवण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवर देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे बदलापूरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी
मालमत्ताधारकांची प्रत्यक्ष तपासणी; तसेच ऑनलाइन पडताळणी करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कोणतीही अनियमितता अथवा कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकी करवसुली वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election 2026 : मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न? पिंपरी-चिंचवडमध्ये वॉशिंग मशीन, तर नवी मुंबई अन् अमरावतीत पैशांचा बॅगा जप्त

Accident News: भीषण! ट्रक आणि एर्टिगा कारचा भयंकर अपघात; ६ महिलांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूक

Pakistan Cricket: भिकारड्या पाकिस्तानवर वाईट वेळ! क्रिकेट संघ काढला विक्रीला; लिलावाची केली घोषणा

Railway Accident : भीषण दुर्घटना! क्रेन रेल्ववर कोसळली; २२ जणांचा मृत्यू, ३० पेक्षा अधिक जखमी

Tamhini Ghat Crime : ताम्हिणी घाट खून प्रकरणातील फरार आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून बेड्या; लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT