मुरबाड (वार्ताहर) : महावितरण पथकाने यात्रेच्या काळात दिलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी खांब लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने दशरथ पष्टे यांनी कल्याण विभागाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. यात्रा काळात मिश्रा यांनी म्हसा यात्रास्थळी भेट देऊन तेथील विद्युत यंत्रणा व वीजपुरवठा व्यवस्थेची पाहणी केली. वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले होते. यासाठी चंद्रमणी मिश्रा यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी अधीक्षक अभियंता फुंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर, अभियंता चकोले तसेच मुरबाड महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके उपस्थित होते.