आरोग्याची चाेख व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मतदान केंद्रांवर नागरिकांना, तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गरज भासल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चाेख व्यवस्था केली हाेती.
औषधे, गोळ्या, इंजेक्शन्स व प्राथमिक उपचारासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करण्यात आले हाेते. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले १,६७४ वैद्यकीय चमू कर्तव्यावर तैनात हाेते, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले, की मतदान केंद्रांवर ३,३०० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी कार्यरत हाेते.