५५१ मतदारांची नावे गायब
विरार, ता. १५ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानासाठी अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण होते.
अशातच कौलार बुद्रुक येथे ५५१ मतदारांची नावे गायब असल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वसई पश्चिमेला असलेल्या कौलार बुद्रुक पाड्यावरील जवळपास ५५१ मतदारांची नावेच गायब झाल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. याठिकाणी मतदार यादी बदलल्याने ही नावे गायब झाली आहेत. प्रभाग २५ मध्ये हा प्रकार घडल्याचे बोलले आहे. यामध्ये भिमातवाडी, दाभोळ, मुक्तवडी, शेतीवाडी, लोखंडेबेने, दिलरबेने, कंदलाईदेवले भागांचा समावेश आहे. मतदारांची नावे गायब झाल्याने प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.