मुंबई

परिधान करता येणारा, हलका फॅब्रिक पॅच (थर्मल बॅटरी) विकसित

CD

परिधान करता येणारी ‘थर्मल बॅटरी’ विकसित
आयआयटी मुंबई, आयआयएसईआर तिरुअनंतपुरमचे संशोधन
मुंबई, ता. १५ ः सौरऊजेवर चार्ज होणारी, अंगावर सहजपणे परिधान करता येणारी आणि थंड हवामानात शरीरातील नैसर्गिक उष्णता टिकवून ठेवणारी ‘थर्मल बॅटरी’ (फॅब्रिक पॅच) आयआयटी मुंबई आणि आयआयएसईआर तिरुअनंतपुरमने संयुक्तरीत्या विकसित केली आहे. विशेष म्हणजे, हा पॅच थेट सूर्यप्रकाश शोषून, त्याचे उष्णतेत रूपांतर करून साठवतो आणि अंधारात ही उष्णता हळूहळू सोडतो. विशेष म्हणजे, त्यासाठी कोणत्याही वायर किंवा जड घटकांची आवश्यकता नसल्याचे संशोधकांनी सांगितले.
आयआयटी मुंबईतील गौतम नायक, प्रा. संदीप साहा आणि प्रा. चंद्रमौळी सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वात आणि आयआयएसईआर तिरुअनंतपुरम येथील प्रा. विनेश विजयन यांच्या सहकार्याने हे संशोधन करण्यात आले. नुकतेच ते एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले. या फॅब्रिक पॅचचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे परिधानयोग्य स्वरूप. हा पॉलिमरमिश्रित पदार्थ थेट कापडावर लेपित करून हातमोज्यात समाविष्ट करण्यात आला. हा पदार्थ जैव-सुसंगत असल्याने, त्यापासून मानवी त्वचेला कोणताही धोका नसल्याचे प्रा. संदीप साहा यांनी स्पष्ट केले. सूर्यप्रकाशात हा पॅच वेगाने तापतो; मात्र तो परिधान केलेल्या व्यक्तीला फारसा चटका लागत नाही. सूर्यप्रकाश संपल्यावर त्यात साठवलेली उष्णता हळूहळू बाहेर पडते आणि त्यापासून दीर्घकाळ ऊब मिळते.
---
कोणत्या पदार्थांचा वापर?
संशोधकांनी पॉलिइथिलीन ग्लायकॉल (पीईजी) आणि पॉलिस्टायरीन को-अ‍ॅलिल अल्कोहोलपासून (पीएसएए) एक पॉलिमर तयार केला. ‘पीईजी’ हा लवचिक पॉलिमर असून त्यात उष्णता साठवण्याची क्षमता अधिक आहे, तर ‘पीएसएए’ हा कठीण पॉलिमर संरचनात्मक स्थैर्य प्रदान करतो, असे प्रा. चंद्रमौळी सुब्रमण्यम यांनी सांगितले.
----
देखभाल व वापर अधिक सोपा
फॅब्रिक पॅच उष्णता ऊर्जा साठवण्याच्या तत्त्वावर कार्य करते. डिस्चार्जदरम्यान ती उष्णता सोडते आणि पारंपरिक बॅटरीप्रमाणे रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर न करता, इलेक्ट्रोडशिवाय कार्य करते. सूर्यप्रकाशात कधीही चार्ज करून पुन्हा पुन्हा वापरता येत असल्याने तिचा पुनर्वापर मोठ्या प्रमाणात करता येतो. शिवाय त्याचे उत्पादन, देखभाल-दुरुस्तीही अधिक सोपी आहे.
----
मापदंडांपेक्षा अधिक सरस
६९ अंश सेल्सिअसपर्यंत तापतो
---
५० डब्ल्यूएच/केजी
ऊर्जा घनता
---
१२९ डब्ल्यूएच/केजी
शक्ती घनता
---
९७ टक्के
उष्णता साठवण कार्यक्षमता
---
३००
वेळा वापरूनही कार्यक्षमता योग्य
------
फोटो - MUM26F23955

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live: सत्ता कुणाची? महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल आज, राजकीय भवितव्य ठरणार

Indian Coast Guard Operation Video: तटरक्षक दलाची मोठी कारवाई! अरबी समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या नऊ पाकिस्तानीना पकडलं!

Indian Evacuation from Iran : इराणमधील संकटात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने सज्ज; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT