मुंबई

मतदानाचा उत्साह आणि मतदार यादीतील ''घोळा''चे सावट

CD

पनवेलमध्ये मतदानाचा उत्साह आणि मतदार यादीतील ‘घोळा’चे सावट
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ ः पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी झालेले मतदान उत्साहात झाले असले, तरी मशीन बिघाड, मतदान प्रक्रियेत विलंब आणि आरोप-प्रत्यारोपाच्या प्रकरणांवर गाजले. महापालिकेने जनजागृती आणि उमेदवारांनी केलेल्या राजकीय प्रचारामुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे समजते आहे.
गेल्यावेळी २०१७च्या निवडणुकीत पनवेलमध्ये ५५ टक्के नोंद झाली होती. आता यात वाढ झाल्यामुळे वाढीव मतदानाचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला फायदा होईल की नाही, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. पनवेलमध्ये ७८ जागांपैकी ७१ जागांसाठी मतदान झाले. पहिल्या सहा जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित प्रभागातील मतदारांना मतदान करायला मिळाले. महापालिकेकडून विविध मतदान केंद्रांवर जय्यत तयारी करण्यात आली होती; मात्र खुटारी, तळोजा, खारघर, कामोठे या भागातील मशीन बिघडल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला होता; परंतु तरीदेखील मतदारांचा उत्साह चांगला असल्यामुळे दुपारी १२ पासून मतदानाचा जोर वाढला. संध्याकाळी ३.३० नंतर मतदानाची टक्केवारी ४३ टक्क्यापर्यंत गेली. ५.३० वाजेपर्यंत ही आकडेवारी ५८ टक्क्यापर्यंत गेल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत मनसेची विजयी घोडदौड सुरू... आतापर्यंत किती जागा जिंकल्या?

MBMC Results: मीरा-भाईंदरमध्ये भाजप मोठ्या फरकाने सत्तेत येणार! इतर पक्षांना मोठा फटका; जाणून घ्या विजयी उमेदवारांची यादी

Zen G उमेदवार, वयाच्या २४ व्या वर्षी बनली नगरसेवक! इंजनिअरिंग ते पॉलिटिक्स; कोण आहे दुर्गेश्वरी कोसेकर?

Ambadas Danve’s First Reaction After Defeat : ‘’सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही हेच सत्य’’ ; छत्रपती संभाजीनगरातील पराभवानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Video : अधिराचा आत्महत्येचा प्रयत्न ! मालिकेच्या कथानकातील सततचे बदल पाहून प्रेक्षक वैतागले; "आता तारिणीला आणा.."

SCROLL FOR NEXT