मुंबई

नेरुळमध्ये विजयी मिरवणुकीदरम्यान शिवसेना शहरप्रमुखाच्या कार्यालयावर हल्ला

CD

नेरूळमध्ये शिवसेना शहरप्रमुखाच्या कार्यालयावर हल्ला
नवी मुंबई, ता. १६ : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नेरूळमधून रुपाली भगत या विजयी झाल्यानंतर नेरूळ परिसरात काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीला हिंसक वळण लागल्याची घटना घडली. या मिरवणुकीदरम्यान नवी मुंबई शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली भगत यांची विजयी मिरवणूक विजय माने यांच्या कार्यालयासमोरून जात असताना गणेश भगत, त्याचे दोन भाऊ आणि कार्यकर्त्यांनी अचानक विजय माने यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड सुरू केली. या वेळी कार्यालयात उपस्थित असलेले विजय माने यांचे पुतणे यांना बेदम मारहाणही करण्यात आली. कार्यालयातील साहित्याची नासधूस करीत गुलाल उधळण्यात आला.
या हल्ल्यावेळी ‘आम्ही गाववाले कॉलनीवाल्यांना संपवणार आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून करतो,’ अशा धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोप विजय माने यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी करीत शिवसेनेचे शिष्टमंडळ रात्री नेरूळ पोलिस ठाण्यात दाखल झाले असून, हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान, या घटनेनंतर नेरूळ परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नेरूळ पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातल्या ४१ प्रभागातील सर्व विजयी नगरसेवकांची यादी एका क्लिकवर; भाजप १२०, राष्ट्रवादी २६, कुणाला किती जागा?

Pune Municipal Election Result : पुण्यात भाजपचे ‘शतक’पार! तब्बल १२० जागांवर विजय; काँग्रेसला १५ ठिकाणी यश

Pimpri News : गुलालावर फटाक्याची ठिणगी पडल्याने सात जण जखमी

PCMC Election Result : पिंपरीत भाजपची एकहाती सत्ता! भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत; अन्य पक्ष निष्प्रभ

BMC Election Result : मुंबई महापालिकेच्या १६१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप महायुतीची सत्ता, विजयाची 'ही' आहेत ५ कारणे

SCROLL FOR NEXT