मुंबई

शिवरायांच्या अपरिचित स्फूर्तिकथांचे अभिवाचन

CD

शिवरायांच्या अपरिचित स्फूर्तिकथांचे अभिवाचन
२३ जानेवारीला माटुंग्यात ‘शेर शिवराज है’ कार्यक्रम

मुंबई, ता. २१ : युनेस्कोने जागतिक वारसास्थळांच्या यादीत महाराष्ट्रातल्या ११ किल्ल्यांचा समावेश केला आहे. यामध्ये रायगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे.
ही मान्यता मिळाल्यामुळे प्रेरित होऊन शिवप्रेमी आणि दुर्गअभ्यासक संदीप विचारे यांनी ‘शेर शिवराज है’ या मराठी अभिवाचन कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. श्री शिवप्रताप प्रतिष्ठान आणि उर्विजा थिएटरतर्फे सादर होणाऱ्या या कार्यक्रमात, शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाविषयी फारशा परिचित नसलेल्या पण ऐतिहासिक आधार असलेल्या कथा लोकांसमोर येणार आहेत.
शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी ६.३० वाजता माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील साळगावकर प्रायोगिक रंगमंचावर होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. या अभिवाचन कार्यक्रमात अभिजित धोत्रे, अजय धुमाळ, दिग्विजय चव्हाण, प्रसाद वैद्य, कालिका विचारे, विनायक बागवे, प्रदीप जोशी आणि प्रकाश निमकर हे सहभागी होणार आहेत. संकलन, दिग्दर्शन संदीप विचारे यांचे आहे. याआधीही संदीप विचारे यांनी व्यावसायिक नाटके केली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडवणाऱ्या ‘दर्या भवानी’ या नाटकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Alphonso mango : रत्नागिरी हापूस आता एआय तंत्रज्ञानावर; मोबाईल ॲपवरून बागेचे व्यवस्थापन होणार, हापूस शेतीत डिजिटल क्रांती

'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

SCROLL FOR NEXT