मुंबई

बालक–पालक उत्सव

CD

चिमुकल्यांच्या कलागुणांनी कांबा परिसर बहरला
बालक-पालक उत्सवात सामाजिक एकात्मता
टिटवाळा, ता. २८ (वार्ताहर) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (कल्याण ग्रामीण) आणि कल्याण पंचायत समितीच्या वतीने कांबा येथे ‘बालक-पालक’ क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक एकात्मता आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या आशाताई भोईर होत्या. मुख्य अतिथी म्हणून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे’ सदस्य संजय कांबळे, माजी उपसरपंच संदीप पावशे आणि ग्रामपंचायत अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होते. राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने उत्सवाचा प्रारंभ झाला. मुख्य सेविका प्रज्ञा निपूर्ते, शुभांगी बनसोडे, भारती सुरोशे, सुजाता गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. जांभूळ बिटमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे हा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा न राहता एक सामूहिक कौटुंबिक उत्सव ठरला. यशस्वी बालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

जांभूळ बिट अंतर्गत येणाऱ्या वाघेरापाडा, नानेपाडा, पठारपाडा, पाचवा मैल आणि पावशेपाडा या गावांमधील अंगणवाड्यांनी या उत्सवात सहभाग घेतला होता. धावणे, गाणी, नृत्य आणि विविध खेळांमध्ये मुलांनी आपला कौशल्य दाखवले. मुलांसोबतच पालकांनीही विविध स्पर्धांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar News: वेळ पाळणाऱ्या दादांची अकाली एक्झिट! ६६ वर्षे, ६ महिने, ६ दिवस...; वयाचा विचित्र योगायोग

प्रत्येक सिनेमात काम करताना निर्मिती सावंतना हव्या असतात 'या' दोन गोष्टी; स्वतः केला खुलासा, म्हणाल्या, 'पहिली म्हणजे...'

Ajit Pawar Death News LIVE Updates : विद्या प्रतिष्ठाणच्या प्रांगणात कार्यकर्त्यांची गर्दी,

Latest Marathi News Live Update : पंतप्रधानांचा दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंड येथे वार्षिक एनसीसी पीएम रॅलीमध्ये सहभाग

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा इतिहास; तासगाव तालुक्याचे निर्विवाद वर्चस्व

SCROLL FOR NEXT