मुंबई

पादचाऱ्यांची कोंडी

CD

रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
खारघरमध्ये पादचाऱ्यांची कोंडी

खारघर, ता. २८ (बातमीदार) : खारघर सेक्टर सातमधील बँक ऑफ इंडियाकडून शिवमंदिरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी आणि मार्जिनल स्पेसमध्ये दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. पालिका प्रशासनाने रस्ता आणि पदपथ मोकळे करावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
बँक ऑफ इंडियाकडून शिवमंदिरमार्गे घरकुल आणि डेली बाजारकडे जाणारा रस्ता हा खारघर वसाहतमधील सर्वात वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील मार्जिनल स्पेसमध्ये सामान मांडून ठेवले आहे. परिणामी नागरिकांना पदपथावरून चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे लोकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.
सकाळ-संध्याकाळी कार्यालयीन वेळेत या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यातच पदपथ अडवल्याने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, पादचाऱ्यांसाठी राखीव असलेली जागा पूर्णपणे व्यापली गेली आहे. या रस्त्यावर चालायचे तरी कसे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


वाहतूक कोंडीत भर

दुकानदारांकडून मार्जिनल स्पेसचा वापर केला जात आहे. दुकानाच्या बाहेर रॅक ठेवून सामान विक्री केली जात आहे. दरम्यान, अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे या अतिक्रमणाविरोधात कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली जात आहे.

फोटो - 797

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

Pune News : ‘एआरएआय’तर्फे ‘ॲडास’ची यशस्वी चाचणी; टाकवे येथे देशातील पहिली ‘अ‍ॅडास सिटी’ सज्ज

Pune News : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच, २४ जणांची यादी पाठवली प्रदेश भाजपकडे

Latest Marathi News Live Update: घनकचरा विभागात पुन्हा ठेकेदाराचे दबावतंत्र

SCROLL FOR NEXT