वसईकरांची तहान भागवणारा नेता
सूर्या पाणीपुरवठा योजनेसाठी अजित पवारांची मदत
विरार, ता. २८ (बातमीदार)ः वसईकरांना सतावणारा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्य सरकारकडे सूर्या पाणीपुरवठा योजनेची मागणी केली होती. त्या वेळी एमएमआरडीए क्षेत्राच्या बाहेर असलेल्या वसईला अजितदादांनी पुढाकार घेऊन योजनेसाठी निधी दिला होता. त्यामुळे वसईकरांची तहान भागवणारा नेता, अशी कायमची ओळख अजित पवार यांची वसईकरांच्या मनात कोरली गेली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. संपूर्ण महाराष्ट्र अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत असताना वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर हेदेखील या घटनेने भावुक झाले होते. राजकारणातील दादा माणूस गेला. घरातील मोठा दादा तसाच राजकारणातील दादा असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांशी निगडित एखादे काम असेल ते नियमात कसे बसेल, हे अधिकाऱ्यांना सांगणारे दादा होते. वसईकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा सूर्या पाणीपुरवठा योजनेवेळी अजितदादांना भेटल्यानंतर तत्काळ अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यामुळे आज वसईकरांना पाणी मिळाल्याची आठवण त्यांनी आवर्जून व्यक्त केली.
-------------------------------------
विकासकामांना भरीव निधी
वसई तालुक्यासाठी पर्यटन विकास योजना, वसई-विरार शहर महापालिकेतील कामे, अल्पसंख्याक विभाग, कोकण आपत्ती सौमीकरण अंतर्गत पालघर जिल्ह्यातील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची उभारणी, वसई तालुक्यातील भूमिगत विद्युतवाहिन्यांचे काम, वसई तालुक्यातील ग्रामीण भागासाठी २,५१५ योजना, ३,०५४ योजनेअंतर्गत भरीव निधी दिला आहे.
-------------------------------------
वसई-विरार शहरावर अजितदादांचे विशेष प्रेम होते. वसईच्या विकासासाठी लागणाऱ्या योजनांसाठी निधी त्यांनी कमी पडू दिला नाही. वसई-विरार महापालिकेतील विजयाबद्दल दोनच दिवसांपूर्वी त्यांनी अभिनंदनपर फोन केला होता. विकासकामांसाठी आमदार फंड दादांमुळेच पाच कोटींपर्यंत झाला.
- हितेंद्र ठाकूर, माजी आमदार, बविआ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.