अजित दादांच्या आठवणींना उजाळा
विक्रमगड (बातमीदार)ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा अपघातात मृत्यू झाल्याने विक्रमगड तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने विक्रमगड तालुक्याची बाजारपेठ बंद होती. यावेळी काँग्रेस पक्षाचे विक्रमगड तालुका अध्यक्ष घनश्याम आळशी यांनी राज्यातील उमदा नेता, प्रशासकीय कामकाजावर पकड, जाण असलेला व्यक्तिमत्व अशी अजितदादांची ३० वर्षांपासून ओळख असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांसाठी झटणारा, कधीही न थकणारा नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख होती. बारामतीतील पवार घराण्यांचे वैभव, समर्पण म्हणजे अजित दादा होते. जनतेसाठी अहोरात्र झटणारा माणूस म्हणून त्यांनी आयुष्यात अनेक मानाचे कार्य केले. बारामतीमधील सहकारी संस्था संचालक ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असा त्यांचा कारकिर्दीत विविध पैलूंनी प्रतिष्ठित वाटा होता.
ः------------------------------------------
स्मार्ट वर्गातून विद्यार्थ्यांना धडे
विक्रमगड (बातमीदार)ः ओंदे येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बोईसरच्या सुमितोमो केमिकल इंडिया लिमिटेड कंपनीने सीएसआर फंडातून स्मार्ट क्लाससाठी दोन इंटरऍक्टिव्ह पॅनल दिले आहेत. यासाठी कंपनीचे जनरल मॅनेजर व्ही.एस.राजू, एच.आर.मॅनेजर नितीन पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले. या स्मार्ट क्लासचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे माजी प्र.कुलगुरू, राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरुण सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सुधाकर पाटील, संस्थेचे सचिव राजू पाटील, संस्थेच्या संचालिका शीतल पाटील, संस्थेच्या संचालिका दर्शना पाटील, ओंदे गावचे सरपंच स्वप्नील गोविंद उपस्थित होते.
़़ः---------------------------------------
दांडेकर महाविद्यालयात बेरोजगारांसाठी संधी
पालघर (बातमीदार)ः सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कॉन्फिडेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या सहकार्याने ३१ जानेवारीला मेगा जॉब फेअर २०२६ होणार आहे. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यमान विद्यार्थी, माजी विद्यार्थी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्राचे विद्यार्थी, तसेच इतर महाविद्यालयातील इच्छुक उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. या उपक्रमामध्ये नवोदितांसाठी नोकरी, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच ४५०० पेक्षा अधिक नोकरीच्या जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या जॉब फेअरचा पालघर परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन कोरे आणि प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.