मुंबई

एआय-आधारित ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेल सुरू

CD

स्ट्रोक उपचारांना तंत्रज्ञानाची जोड
ग्लेनईगल्स रुग्णालयात एआयआधारित मॉडेल सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वाढत्या स्ट्रोक रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वेळीच निदान व उपचारासाठी एआयआधारित ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेल सुरू करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे मुंबई आणि नवी मुंबईतील निवडक सीटीस्कॅन व एमआरआय सुविधा असलेली डायग्नोस्टिक सेंटर्स थेट रुग्णालयातील स्ट्रोक टीमशी जोडली जाणार आहेत. स्ट्रोक रुग्णांचे वेळीच निदान व उपचार सुनिश्चित करण्यासाठी परळच्या ग्लेनईगल्स रुग्णालयात हे मॉडेल सुरू केले आहे.
या उपक्रमात डॉ. शिरीष हस्तक, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. कुशल भाटिया आणि डॉ. मयूर घरत यांचे सहकार्य लाभत आहे. स्कॅनमध्ये स्ट्रोकचा संशय आढळताच एआय प्रणालीद्वारे डॉक्टरांच्या मोबाईलवर तत्काळ सूचना पाठवली जाते. त्यामुळे, उपचारांतील विलंब टळून ‘गोल्डन विंडो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ४.५ तासांच्या आत उपचार सुरू करणे शक्य होणार आहे. डॉक्टरांच्या मोबाईलवर तत्काळ अलर्ट जाण्याची सोयही या यंत्रणेत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून ही प्रणाली घाटकोपर, मुलुंड, पनवेल आदी भागांतील निवडक केंद्रांमध्ये कार्यान्वित असून आतापर्यंत तीन ते चार रुग्णांवर वेळेत उपचार करण्यात यश आले आहे. डॉ. बिपीन चेवले (सीईओ) यांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे निर्णयप्रक्रिया जलद होऊन रुग्णांचे प्राण व मेंदूची कार्यक्षमता वाचवण्यास मोठी मदत होणार आहे.
मेंदूपर्यंत जाणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे (इस्केमिक स्ट्रोक) किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होणे (हॅमरेजिक स्ट्रोक) असे स्ट्रोकचे प्रकार आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, हृदयविकार आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. वेळेत उपचार न मिळाल्यास पक्षाघात, बोलण्याची क्षमता कमी होणे, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यूदेखील ओढावू शकतो.

निदान आणि उपचारातील दरी घटणार
एआयआधारित ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेलमुळे निदान आणि उपचार यामधील दरी कमी होत असून, भविष्यात अधिक केंद्र या नेटवर्कमध्ये सहभागी झाल्यास स्ट्रोक रुग्णांसाठी वेळेवर आणि समन्वयित उपचार शक्य होतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जीआर आला! लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; आता 'अशी' चूक पुन्हा करु नका

"ते माझ्या पाठीवरून हात फिरवायचे.." मराठी अभिनेत्रीला सिनियर कलाकाराचा चुकीचा स्पर्श ; "मी मोठ्याने बोलले.."

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदच्या 73 जागांसाठी उद्या मतदान

Malaysia Job Portal: विदेशात नोकरीची सुवर्णसंधी! जॉब पोर्टल लाँच झाल्याने मलेशियात एजंटशिवाय मिळणार जॉब

Pashan News : पीएमपीच्या थांब्याअभावी प्रवाशांचे हाल; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT