मुंबई

गनिमी काव्याचा उंबरखिंडीत जागर

CD

गनिमी काव्याचा उंबरखिंडीत जागर
२ फेब्रुवारीला उंबरखिंडीत ३६५ वा विजयदिन सोहळा
खालापूर, ता. ३१ जानेवारी (बातमीदार) : तालुक्यातील चावणी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक समरभूमी उंबरखिंड येथे २ फेब्रुवारी रोजी ३६५ वा विजयदिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. ग्रामपंचायत चावणी, ग्रामस्थ, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती खालापूर व शिवदुर्ग मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
२ फेब्रुवारी १६६१ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली गनिमी युद्धतंत्राचा प्रभावी वापर करत मोजक्या मावळ्यांनी करतालब खानाच्या मुघल सैन्याचा दारुण पराभव केला होता. धनुष्यबाणाचा वापर हे या ऐतिहासिक लढाईचे वैशिष्ट्य होते.
या निमित्ताने शिवशाहीर वैभव घरत यांचा ‘आम्ही मराठी’ शाहिरी कार्यक्रम व शिवव्याख्याते विनय चंद्रकांत दाभाडे यांचे शिवव्याख्यान होणार आहे. सोहळ्यास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच बाळासाहेब आखाडे यांनी केले आहे.
फोटो ओळ ः समरभूमी उंबरखिंड येथे असलेला विजयस्तंभ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: अर्थसंकल्पाच्या दिवशीच महागाईचा स्फोट! गॅस सिलिंडर महाग, छोट्या उद्योगांना जबर धक्का

Latest Marathi News Union Budget 2026 Live : आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार; सर्वसामान्यांपासून उद्योगजगताचे बजेटकडे लक्ष

Tax-Free Nations : कराच्या स्वरूपात ‘या’ देशांमध्ये जनतेकडून एकही रुपया केला जात नाही वसूल!

मुंबईत आजपासून नवी वाहतूक नियमावली, अवजड वाहनं ते पार्किंगसाठी कडक नियम

Maharashtra Weather Update : फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी वातावरणात बदल, IMD चा इशारा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT