मुंबई

कर्जतमध्ये मैत्रीपूर्ण लढत

CD

कर्जतमध्ये मैत्रीपूर्ण लढत
भाजपचे किरण ठाकरे यांची भूमिका चर्चेच्या केंद्रस्थानी

कर्जत, ता. ३१ (बातमीदार) : कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, राजकीय वातावरण तापले आहे. परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर भाजप व शिवसेना शिंदे गट युतीतून निवडणूक लढवत आहेत. कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट असून, माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाकडून रेश्मा मिसाळ या महायुतीच्या उमेदवार मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात परिवर्तन आघाडीच्या सुवर्णा ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. मात्र या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपचे नेते किरण ठाकरे यांची भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या कुटुंबातून राधिका किशोर ठाकरे या रिंगणात असून, मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
उत्तर रायगडमधील पनवेल, उरण आणि कर्जत या मतदारसंघांत असलेल्या २२ जागांवर भाजप शिवसेनेसोबत युतीमध्ये लढत आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, भाजप, आरपीआय, शेकाप अशी युती जाहीर केली. या वेळी चारही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाजपला युतीच्या माध्यमातून तीन पंचायत समिती गणांमधून उमेदवारी मिळाली आहे.
किरण ठाकरे यांनी युतीतून काडीमोड घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जरी या लढतीला ‘मैत्रीपूर्ण’ असे नाव दिले जात असले तरी प्रत्यक्ष प्रचार हा युतीच्याच उमेदवाराच्या विरोधात सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कर्जत नगर परिषद निवडणुकीतही किरण ठाकरे यांनी काही जागा लढवण्याचा हट्ट धरला होता. याआधी २०१९मध्ये भाजपचे चार नगरसेवक सेना-भाजप युतीतून निवडून आले होते. मात्र या वेळी भाजपला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. संघटनात्मक पातळीवर दुर्लक्ष झाल्याने भाजपला येथे मोठा पराभव पत्करावा लागल्याची चर्चा सुरू आहे. मात्र कर्जत नगर परिषदेत भाजपचे चार नगरसेवक असताना आता पक्ष केवळ एकाच जागेपुरता मर्यादित राहिला आहे.

फोटो - 140

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : संरक्षण नाही तर 'या' क्षेत्रावर होणार सर्वाधिक खर्च! शेती आणि शिक्षणावर किती खर्च? शेतीसाठी पैसे वाढले?

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Union Budget 2026: पुढील दशक खेळाडूंचे! क्रीडा क्षेत्रासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Union Budget 2026: परभणीत चोरट्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT