मुंबई

नवी मुंबईत एकल वापर प्लास्टिकवर पालिकेचा कडक दणका

CD

नवी मुंबईत एकल वापर प्लॅस्टिकवर पालिकेचा कडक दणका
चार दिवसांत ६५ हजारांचा दंड; १८ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त
वाशी, ता. ३१ (बातमीदार) : एकल वापर प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनुसार २२ ते २८ जानेवारीदरम्यान शहरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अवघ्या चार दिवसांत ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, १८ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार सर्व विभाग कार्यालय क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व संबंधित उपआयुक्तांच्या नियंत्रणाखाली बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे व घणसोली विभागांत दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला.
दरम्यान, नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी एकल वापर प्लॅस्टिक टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: अर्थसंकल्पाच्या दिवशीच महागाईचा स्फोट! गॅस सिलिंडर महाग, छोट्या उद्योगांना जबर धक्का

Latest Marathi News Union Budget 2026 Live : आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार; सर्वसामान्यांपासून उद्योगजगताचे बजेटकडे लक्ष

Tax-Free Nations : कराच्या स्वरूपात ‘या’ देशांमध्ये जनतेकडून एकही रुपया केला जात नाही वसूल!

मुंबईत आजपासून नवी वाहतूक नियमावली, अवजड वाहनं ते पार्किंगसाठी कडक नियम

Maharashtra Weather Update : फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी वातावरणात बदल, IMD चा इशारा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT