मुंबई

कर्जाच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक

CD

अंबरनाथ, ता. ३१ (वार्ताहर) : वडिलांच्या उपचारांसाठी आणि जुन्या कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेल्या एका महिलेच्या अडचणींचा गैरफायदा घेत बँक कर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल पाच लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेरेन फर्डिनंट डिसुझा (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर येथील अशितोष सोनावणे या आरोपीविरुद्ध अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेरेन डिसुझा यांना त्यांच्या वडिलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी; तसेच वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी मोठ्या रकमेची तातडीची गरज होती. याच परिस्थितीचा फायदा घेत सोनावणे याने स्वतःची कर्ज सल्लागार अथवा एजंट म्हणून ओळख करून दिली. पीडित महिलेच्या बँकिंग व्यवहारांतील मर्यादित माहितीकडे दुर्लक्ष करून, त्याने आयसीआयसीआय बँकेकडून चार लाख रुपयांचे मॉर्गेज टॉपअप कर्ज मंजूर करून देण्याचे प्रलोभन दाखवले. मात्र, प्रत्यक्षात आरोपीने शेरेन यांच्या हातात केवळ ७१ हजार २९० रुपयेच दिले. उर्वरित रकमेबाबत विचारणा केली असता, त्याने अचानक जामीनदार आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार, शेरेन यांनी आपली मैत्रीण भावना ग्यानानी यांना जामीनदार म्हणून उभे केले. मात्र, यानंतर सोनावणे यांनी फिर्यादीची कोणतीही परवानगी न घेता, त्यांच्या तसेच त्यांच्या मैत्रिणीच्या नावावर विविध फायनान्स कंपन्यांमधून सुमारे ९ लाख ३५ हजार रुपयांची वैयक्तिक कर्जे उचलली.
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत सोनावणे याने फिर्यादीच्या नावावर एकूण १४ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. यापैकी केवळ सात लाख ११ हजार २९० रुपये पीडित महिलेला देण्यात आले, तर उर्वरित पाच लाख ४८ हजार ६१५ रुपये आरोपीने परस्पर लाटून अपहार केला. आपली तसेच आपल्या मैत्रिणीची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेरेन डिसुझा यांनी शुक्रवारी अंबरनाथ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया देशमुख करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union budget 2026-27: अर्थसंकल्पात केंद्राचं लाडकं राज्य कोणतं? अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्प

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

VIDEO : विकृतीचा कळस! श्वानाच्या पिल्लाला जबरदस्ती पकडलं अन् दारू पाजली; तरुणांचं संतापनजक कृत्य

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

SCROLL FOR NEXT