मांडा-टिटवाळ्यातील नाला तुंबला
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
टिटवाळा, ता. १ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील मांडा-टिटवाळा भागातील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य नाला सध्या पूर्णतः तुंबला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट ओढावले आहे.
साचलेला कचरा आणि डासांचा प्रादुर्भाव रेल्वे स्थानकाजवळील सुमुख सोसायटी परिसरातून वाहणाऱ्या या नाल्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या, घरगुती कचरा आणि गाळ साचल्याने पाण्याचा नैसर्गिक निचरा थांबला आहे. पाणी ठिकठिकाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजारांची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळा तोंडावर असल्याने जर वेळीच स्वच्छता झाली नाही तर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तविली आहे.
प्रशासनाला साकडे
या गंभीर समस्येकडे सामाजिक कार्यकर्ते व कायदेविषयक सल्लागार अॅड. जितेंद्र जोशी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी घनकचरा व सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त कोकरे, घुटे व सॅनिटरी इन्स्पेक्टर कराळे यांच्याकडे तातडीने नालेसफाई करण्याची मागणी केली आहे. नाल्यात साचलेला कचरा आणि गाळ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने पावसाळ्याची वाट न पाहता तातडीने कचरा उचलून नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. जितेंद्र जोशी यांनी केली आहे.
आरोग्य निरीक्षकांचे आश्वासन
आरोग्य निरीक्षक कराळे यांनी सांगितले, की माझ्याकडे अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तरीही तक्रारीची वाट न पाहता मी स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करेन. जर नाल्याची समस्या गंभीर असेल तर त्यावर तातडीने योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.