मुंबई

नियम मोडणाऱ्यांना दणका

CD

नियम मोडणाऱ्यांना दणका
वाहनचालकांना साडेसात कोटींचा दंड
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मिरा-भाईदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयांतर्गत वर्षभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई करत आहे. याअंतर्गत काशी मिरा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी साडेसात कोटींहून अधिक दंडाची रक्कम वसूल केला आहे.
१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर ९३,०९८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सात कोटी ८७ लाख ७६,७५० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून बारीक नजर ठेवण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात २८४ मद्यपी वाहनचालकांवर ड्रिंक अँड ड्राइव्हचे गुन्हे दाखल करण्यात आले.
-----------------------------------
वाहतूक पोलिस तैनात
- कारवाईमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, सिग्नल मोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहन चालवताना फोनवर बोलणे, धोकादायकरीत्या वाहन चालवणे, नो पार्किंग, विनासीटबेल्ट चारचाकी चालवणे यासह अन्य गुन्ह्यांचा समावेश आहे.
- नाताळ ते नववर्ष स्वागत कालावधीतील कारवाईचाही समावेश आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक नाक्यावर वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले असून, त्यांच्यासोबत वाहतूक मदतनीस तैनात आहेत.
---------------------------
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते. त्याचबरोबर वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी त्यांच्यात नियमांबाबत जागरूकता आणण्यासाठी वेळोवेळी विशेष मोहीमदेखील घेतली जाते.
- सतीश शिवरकर, सहाय्यक आयुक्त, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : संरक्षण नाही तर 'या' क्षेत्रावर होणार सर्वाधिक खर्च! शेती आणि शिक्षणावर किती खर्च? शेतीसाठी पैसे वाढले?

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Union Budget 2026: पुढील दशक खेळाडूंचे! क्रीडा क्षेत्रासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Union Budget 2026: रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर

SCROLL FOR NEXT