मुंबई

इ-प्लॅनेट स्कूलमध्ये संविधानाचा जागर

CD

ई-प्लॅनेट स्कूलमध्ये संविधानाचा जागर
जनता हित फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम
टिटवाळा, ता. १ (वार्ताहर) : कल्याण तालुक्यातील खडवली येथील ई-प्लॅनेट स्कूलमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाला यंदा सामाजिक जाणिवेची जोड लाभली. या कार्यक्रमात भारतीय संविधानातील मूल्यांचा जागर करण्यात आला तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शिक्षकांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी स्नेहसंमेलनाचे वातावरण रंगत गेले.

संविधान आणि पर्यावरण यांचा संगम या वेळी जनता हित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सचिव नियाज शेख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची माहिती देत संविधानिक मूल्यांची जपणूक करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले.

वृक्षरोपांचे वाटप
वृक्षरोपांचे वाटप या उपक्रमाचे औचित्य साधून फाउंडेशनतर्फे शाळेतील सर्व शिक्षकांना रोपांचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अली शेख आणि डायरेक्टर मोहम्मद आरिफ शेख यांनी पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाप्रति आपुलकी अधिक दृढ झाल्याची भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

Indian Royal Family : भारतातील 5 महान राजांचे वंशज काय आज करतायत? कसे आहे त्यांचे जीवन..पाहा ऐतिहासिक वारसा

Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार

SCROLL FOR NEXT