पोटे मैदानात साचलेल्या कचऱ्याला आग
कल्याण ता. १ (बातमीदार) : कल्याण पूर्वेकडील गजबजलेल्या पोटे मैदान परिसरात साचलेल्या कचऱ्याला शुक्रवारी (ता. ३०) अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
मैदानाच्या एका कोपऱ्यात दीर्घकाळ साचून राहिलेल्या कचऱ्याने दुपारी अचानक पेट घेतला. आगीच्या ज्वाळा आणि दाट काळा धूर आकाशात उंचावर गेल्याने आसपासच्या रहिवाशांची धावपळ उडाली. काही नागरिकांनी या घटनेचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित केले. यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्रशासन की नागरिक? कोणाचा निष्काळजीपणा?
या घटनेनंतर मैदानात कचरा साचू देणाऱ्या यंत्रणेवर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेची कचरा संकलन यंत्रणा कार्यरत असतानाही काही बेशिस्त नागरिक घरातील कचरा उघड्यावर आणून टाकतात, असा दावा जबाबदार नागरिकांनी केला आहे.
कारवाईची मागणी
मैदानाची अवस्था डम्पिंग ग्राउंडसारखी झाली आहे. महापालिकेच्या गाड्या दररोज येतात, तरीही लोक उघड्यावर कचरा फेकतात. अशा बेशिस्त नागरिकांना दंड ठोठावून कडक कारवाई व्हायला हवी, तरच अशा आगीच्या घटना थांबतील, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.