मुंबई

समता विद्या मंदिर शाळा अव्वल

CD

समता विद्या मंदिर शाळा अव्वल
एल वॉर्ड अंतर्गत समूहनृत्य स्पर्धा

घाटकोपर, ता. १ (बातमीदार) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे एल वॉर्डअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या समूहनृत्य स्पर्धा साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेच्या पटांगणात उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत समता विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
स्पर्धेत एस. पी. डी. सावंत शाळा आणि गांधी बाल मंदिर या दोन शाळांनी संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांक प्राप्त केला. आयईएस मरोळ शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले मुलींची शाळा आणि शिवाजी विद्यालय या शाळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
एल वॉर्ड पालिकेच्या वतीने शुक्रवारी (ता. ३०) पार पडलेल्या या समूहनृत्य स्पर्धेत विभागातील एकूण १३ शाळांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास शालेय स्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेसाठी विभाग निरीक्षिका भारती भवारी आणि सचिव राजेश सुभेदार यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग व शाळा प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.

फोटो - 233

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

Indian Royal Family : भारतातील 5 महान राजांचे वंशज काय आज करतायत? कसे आहे त्यांचे जीवन..पाहा ऐतिहासिक वारसा

Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार

SCROLL FOR NEXT