मुंबई

कचोरेतील शाळेसमोर गतिरोधके बसविण्याची मागणी

CD

कचोरेतील शाळेसमोर गतिरोधक बसवा
कल्याण, ता. २ (बातमीदार) : पत्रीपूल कचोरे येथील शाळेसमोरील रस्त्यावर गतिरोधक बसविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेला स्थानिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या मार्गावरून सतत वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ठरावीक अंतरावर दोन गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पत्रीपूल कचोरे परिसरात सर्वोदय हिंदी विद्यालयाच्या दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळांत हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेसमोरील रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने येथून भरधाव वेगात चालवली जातात. यामुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना सतर्कता बाळगावी लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न कायम असल्याने पालक व शिक्षकांना अपघात होण्याची भीती सतावत आहे. हीच भीती ज्येष्ठ नागरिकांनाही रस्ता ओलांडताना असते. याच दृष्टीने ठरावीक अंतरावर दोन गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात आली आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत एका आठवड्यात गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती निवेदनकर्त्यांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

मी सांगत होते मला कपडे बदलू द्या... घराबाहेर येताच सोनालीने केली पोलखोल; म्हणते- चौथ्या दिवशीच बटवर इन्फेक्शन...

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

Latest Marathi News Live Update: वाशिममध्ये वीटभट्टी जवळील विहरीत पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT