मुंबई

स्पंदन नाट्य संस्था रोहा शहराचा सांस्कृतिक श्वास : नगराध्यक्षा वनश्री शेडगे

CD

स्पंदन नाट्य संस्था रोहा शहराचा सांस्कृतिक श्वास : नगराध्यक्षा वनश्री शेडगे
रोहा, ता. १ (बातमीदार) : रोहा शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या स्पंदन नाट्य संस्थेला २३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी स्पंदन ही संस्था रोहा शहराची सांस्कृतिक श्वास असल्याचे गौरवोद्गार काढले. डॉ. सी. डी. देशमुख नाट्यगृहात पार पडलेल्या स्पंदन संस्थेच्या मान्यताप्राप्त मॉडर्न प्ले ग्रुपच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या.
संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेविका गौरी बरटक्के, प्रियांका धनावडे, सुप्रिया जाधव, रोशन चाफेकर, कीर्तनकार अंजली कवळे, अ‍ॅड. सतीश धारप यांच्यासह पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिदम डान्स अकॅडमी, उर्वशी नृत्यालय, ड्रीम अ‍ॅक्टिंग स्कूल तसेच ‘स्वरगंध’ समूहाच्या नृत्य, अभिनय व गीतसादरीकरणाला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

चौकट
कला व कलाकार जपण्यासाठी सवलतीचे भाडे देण्याचा निर्धार
स्व. अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून रोह्यासारख्या शहराला सांस्कृतिक केंद्र लाभले असून, ही ओळख जपण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे भविष्यात स्पंदनसह इतर सांस्कृतिक संस्थांना कमी भाड्यात सुविधा उपलब्ध करून देत कला व कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी दिले.
फोटो कॅप्शन : नृत्य सादर करताना मुली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"घरचेच काम देत नाहीत बाहेरचे काय देणार ?" प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ करतोय ड्रायव्हरचं काम; मुलगा गंभीर आजारी

Latest Marathi News Live Update : बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या एकनाथ शिंदेंची जाहीर सभा

ना ओरडली, ना मारलं... जेहला धाक दाखवण्यासाठी करिना कपूरने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर आमच्या आईसारखीच...'

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

SCROLL FOR NEXT