पालघरमध्ये एनकेसीसीए रील स्पर्धेला सुरुवात
वाणगाव, ता. १ (बातमीदार) : एनकेसीसीए रील स्पर्धेमुळे पालघर जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला चालना मिळेल, तसेच डिजिटल व्यासपीठावरून जिल्ह्याची सकारात्मक ओळख निर्माण होईल, असा विश्वास उत्तर कोकण चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि एग्रीक्लचरचे अध्यक्ष निमिष सावे यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चर आयोजित महाराष्ट्र पर्यटन, भारत पर्यटन आणि पालघर जिल्हा पर्यटन विकास विभाग यांच्या सहकार्याने पालघर जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक वारसा, ऐतिहासिक किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा तसेच जागतिक कीर्तीची आदिवासी संस्कृती यांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘ एनकेसीसीए रील स्पर्धा २०२६ (पालघर जिल्हा)’ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील युवक, सामग्री निर्माते, पर्यटन व्यावसायिक व स्थानिक नागरिकांना पालघर जिल्ह्याची ओळख डिजिटल माध्यमातून देश-विदेशात पोहोचवण्याची संधी देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे असेही सावे यांनी यावेळी सांगितले.
------------------
चौकट
जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला चालना
पालघर जिल्हा म्हणजे केवळ सागरी, नागरी आणि डोंगरी नसून वारली चित्रकला आणि तारपा नृत्य यांची भूमी आहे, पालघर भूमीत ‘पालघर ६० सेकंदात, लपलेली रत्ने, माझा पालघर माझा अभिमान, संस्कृती आणि वारसा, पालघरची चव’ अशा विषयांवर आधारित रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.