मुंबई

प्राचार्य राजपूत यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान

CD

प्राचार्य राजपूत यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान

पालघर, ता. १ (बातमीदार) : बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे निमित्त साधत लोकशक्ती बाबा भारती प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांचे तलासरीसारख्या ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील शिक्षण क्षेत्रातील योगदान याची एक पोचपावती म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
तलासरी येथील आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, येथे शनिवारी (ता. ३१) ‘ मानविकी, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नावीन्यपूर्ण आणि उदयोन्मुख प्रवाह’ या विषयाला अनुसरून प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी देशभरातील आणि परदेशातील सुमारे २०० संशोधकानी आपल्या शोधनिबंधांचे वाचन केले. परिषदेसाठी परिसरातील मान्यवर, कला वाणिज्य व विज्ञानक्षेत्रात रुची असणारे संशोधक उपस्थित होते. परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रो. ए. डी. सावंत, माजी कुलगुरू राजस्थान विद्यापीठ आणि माजी प्र-कुलगुरू मुंबई विद्यापीठ आणि विशेष अतिथी म्हणून प्रो. के. एन. घोरुडे, माजी प्राचार्य वर्तक कॉलेज वसई यांच्यासमवेत युगांडाचे प्रा. डॉ. कुले जेराल्ड, घानाचे प्रा. डॉ. गोडविन केटो, तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक, नगराध्यक्ष सुरेश भोये, नगरसेवक सुहास सुरती, आदिवासी प्रगत मंडळाचे अध्यक्ष कॉ. हेमलता कोम, सचिव रूपेश राणे, अजितदादा नार्वेकर, हसुभाई ठक्कर यासह पालघर, दमण, वापी, डहाणू आणि सिल्वासा आदी परिसरातील महाविद्यालयांचे प्राचार्य व संशोधक शास्रज्ञ उपस्थित होते.
या परिषदेत मानविकी, समाजशास्त्र, साहित्य (मराठी साहित्य चळवळी, दलित व भक्ती साहित्य), विज्ञान आणि तंत्रज्ञान (एआय, नॅनो टेक्नॉलॉजी), वाणिज्य, व्यवस्थापन आणि ग्रंथालय शास्त्र यासारख्या विविध विषयांवर चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले. भारतीय ज्ञान प्रणाली (आयकेएस) आणि शाश्वत विकास यांसारख्या आंतरविद्याशाखीय विषयांचाही यात समावेश होता. दुपार सत्रात ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा पद्धतीने संशोधकांनी आपले संशोधन मांडले. दुपार सत्रातील टेक्निकल सत्रासाठी प्राचार्य डॉ. सुचिता करवीर, प्राचार्य डॉ. सोमनाथ विभूते, प्रा. डॉ. संदीप बेले, प्राचार्य डॉ. विष्णू यादव यांनी सत्राध्यक्ष म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : संरक्षण नाही तर 'या' क्षेत्रावर होणार सर्वाधिक खर्च! शेती आणि शिक्षणावर किती खर्च? शेतीसाठी पैसे वाढले?

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Union Budget 2026: पुढील दशक खेळाडूंचे! क्रीडा क्षेत्रासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Union Budget 2026: परभणीत चोरट्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT