उलवे, ता. २ (बातमीदार) : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय पक्षांमधील अंतर्गत नाराजीचा थेट फटका गव्हाण परिसरात पक्षाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीची समीकरणे बदलत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. उमेदवारीवरून नाराज असलेले काही स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिल्याने भाजपची ताकद विभागली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उलवेतील पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, पुनर्वसन झालेल्या ग्रामस्थांचे प्रश्न, आरोग्य व शिक्षण सुविधा, तसेच विकासकामांची रखडपट्टी हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी आहेत. या परिस्थितीचा परिणाम उलवे परिसरात स्पष्टपणे जाणवत असून, येथे प्रचारात कमालीची रंगत आली आहे. विविध पक्षांचे उमेदवार, तसेच अपक्ष उमेदवार घरोघरी भेटी, बैठका, प्रचार फेऱ्यांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी संपूर्ण परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
उमेदवारांकडून विकासाची विविध आश्वासने दिले जात आहेत. काही भागांत अपक्ष उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता पक्षीय उमेदवारांची चिंता वाढली आहे. उलवे परिसरातील मतदारांचा कल कोणत्या बाजूने झुकतो, यावर गव्हाण जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे.
नाराजीचा फायदा होण्याची शक्यता
यंदा अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने मतदारांचे विभाजन होण्याची शक्यता वाढली आहे. भाजपमधील नाराजी वेळीच दूर झाली नाही, तर त्याचा फायदा अपक्ष उमेदवारांना होऊन राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.