मुंबई

काजूच्या झाडांना बहर

CD

काजूच्या झाडांना बहर
विक्रमगड-जव्हार तालुक्यात झाडांना मोहोर
विक्रमगड, ता. २ (बातमीदार) ः विक्रमगड, जव्हार तालुक्यातील वातावरण तुलनेने थंड, कोरडे राहिल्याने काजू झाडांना योग्य वातावरण मिळाले आहे. त्यामुळे डोंगरपट्टी परिसरात काजू झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये काजू मुख्य नगदी पीक मानले जाते. विशेषतः डोंगरउतार, हलक्या जमिनीत पीक चांगले येत असल्याने आदिवासी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. सध्या झाडांवर पिवळसर-पांढऱ्या फुलांच्या घोसांनी बागा बहरल्या असून येत्या काही आठवड्यांत लहान काजूगर, सफरचंद आकार घेण्यास सुरुवात होणार आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, मोहोराच्या काळात हवामानातील अचानक बदल, अवकाळी पाऊस किंवा दाट धुक्यामुळे फुलगळ होण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कीडरोग व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने काजूलागवड करीत नैसर्गिक खतांचा वापर केल्याने झाडांची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे योग्य काळजी घेतल्यास यंदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : दुर्दैवी अंत! ४ महिन्यांच्या मुलीसह मायलेकांनी विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन; पाबळमधील हृदयद्रावक घटना

Latest Marathi News Live Update : आज ठरणार नाशिकचा नवा महापौर, कुणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

Paragliding Destinations: तुम्हालाही आकाशातून जग पाहायचंय? भेट द्या या 5 अप्रतिम पॅराग्लायडिंग डेस्टिनेशन्सना

रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी!

Kolhapur ZP : सा. रे. पाटील यांच्या ताकदीने इतिहास घडला; यशोदा कोळी अध्यक्षपदी, त्यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT