औद्योगिक कचऱ्याची धास्ती
तारापूर परिसरात जाळण्याचे प्रकार, आगीचा धोका
बोईसर, ता. २ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अवधनगर परिसरात कपडा कारखान्यांतील औद्योगिक कचरा भंगारवाले बेकायदेशीरपणे हाताळत आहेत. तसेच निरुपयोगी कचरा खुलेआम जाळण्यात येत असल्याने मान, गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील प्रदूषणात वाढ झाली आहे.
डोंगराळ भागातील आदिवासींच्या जमिनी भाड्याने किंवा ताब्यात घेऊन मोकळ्या जागेत कचरा साठवण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणीही कचऱ्याची जाळपोळ सुरू असून, आजूबाजूच्या जंगल, डोंगराळ परिसराला आग लागण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, हवेतील प्रदूषण वाढल्याने थेट परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महसूल प्रशासनाने तातडीने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
--------------------------------
रसायनांचा गटारांमध्ये विसर्ग
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ई-झोन परिसरात औद्योगिक नियमांना धाब्यावर बसवून केमिकलयुक्त सांडपाणी गटारीत सोडले जात आहे. या पाण्यामुळे गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या असून, सार्वजनिक रस्ते प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. औद्योगिक आस्थापनांतून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी नियमाप्रमाणे चेंबरमार्गे सीईटीपीकडे पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, काही कारखान्यांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.