मुंबई

अजितदादा शब्द पाळणारा नेता

CD

अजितदादा शब्द पाळणारा नेता
नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर यांचे प्रतिपादन
वसई, ता. २ (बातमीदार)ः वसईच्या विकासासाठी अजितदादांनी केलेली मदत नेहमी आठवणीत राहील. दादांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली. त्यामुळे शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादा कायमच स्मरणात राहतील, असे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केले.
वसई विरार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सर्वपक्षीय शोकसभा नालासोपारा येथे झाली. या सभेमध्ये दादांचा अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे आम्ही कार्यकर्ते पोरके झाल्याची भावना व्यक्त केली. आयुष्यभर दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत जनहित जपले, अशा भावना व्यक्त केली. या वेळी ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी अजितदादांनी वसईच्या पाणी योजनेसाठी कोट्यवधी रुपये दिल्याची आठवण काढली. मराठा समाजाचे नेते विश्वास सावंत यांनी अजितदादा म्हणजे मराठा भूषण होते, असे म्हटले. या शोकसभेसाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिरीष चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हाप्रळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे, भाजप नेते विश्वासराव सावंत, भाजपचे अल्पसंख्याक अध्यक्ष मुजफ्फर घनसार, नितीन म्हात्रे, हार्दिक राऊत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

मी सांगत होते मला कपडे बदलू द्या... घराबाहेर येताच सोनालीने केली पोलखोल; म्हणते- चौथ्या दिवशीच बटवर इन्फेक्शन...

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

Latest Marathi News Live Update: मुंबईत कोणतीही मुलं बेपत्ता झालेली नाहीत, पोलिसांची माहिती

SCROLL FOR NEXT